• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २२ लाखांहून अधिक रोकड व दागिने लंपास !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 17, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २२ लाखांहून अधिक रोकड व दागिने लंपास !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ एप्रिल २०२६ 

शहरातील विमानतळ परिसरातील तारा बिझनेस पार्कमध्ये एका व्यावसायिकाच्या बंद घरावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत सुमारे २२ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कुसुंबा खुर्द (विमानतळ परिसर) येथे तारा बिझनेस पार्कमध्ये राहणारे मोईज अब्बास बोहरा (वय ४८) हे ‘रुबी पेंट’ या रंगाच्या व्यवसायाशी संबंधित आहेत. त्यांच्या घराच्या तळमजल्यावर फॅक्टरी असून वरच्या मजल्यावर ते कुटुंबासह वास्तव्यास आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून घरात रंगकाम व फर्निचरचे काम सुरू होते. १० एप्रिल रोजी मोईज बोहरा हे दर्शनासाठी बऱ्हाणपूर येथील हकीमी दर्ग्याकडे रवाना झाले होते. त्यानंतर १३ एप्रिल रोजी त्यांनी कुटुंबीयांनाही तेथे बोलावून घेतले. संपूर्ण कुटुंब घराला कुलूप लावून बाहेर गेल्याची संधी साधत चोरट्यांनी आपला डाव साधला.

१५ एप्रिल रोजी पहाटे सुमारे २.१५ वाजता बोहरा कुटुंब घरी परतले असता, घराच्या वरच्या मजल्याचा दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरवाजाचे कुलूप तुटलेले पाहून चोरी झाल्याचा संशय बळावला. घरात प्रवेश केल्यावर हॉलमधील तीन गोदरेज कपाटांचे कुलूप तोडून सामान अस्ताव्यस्त टाकलेले दिसले. तपासणीदरम्यान चोरट्यांनी कपाटातील लॉकरमधून १० लाख १२ हजार रुपयांची रोकड, १० ग्रॅमचे सोन्याचे ब्रेसलेट, २१ ग्रॅमच्या पाच अंगठ्या, तसेच २८ ग्रॅम वजनाच्या सोन्या-चांदीच्या बांगड्या असा एकूण १२ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज चोरल्याचे समोर आले. अशा प्रकारे एकूण मुद्देमालाची किंमत २२ लाख रुपयांहून अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. घरात फर्निचरचे काम सुरू असल्याने तसेच फॅक्टरीत अनेक मजूर ये-जा करत असल्याने, कोणीतरी ओळखीच्या व्यक्तीने घरावर पाळत ठेवून हा गुन्हा केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याप्रकरणी मोईज बोहरा यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे करत आहेत. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Related Posts

इंग्रजी नोटिसांचा गुंता सोडा, मराठीत संवाद साधा : जळगावकरांचे NHAI ला साकडं !
जळगाव

इंग्रजी नोटिसांचा गुंता सोडा, मराठीत संवाद साधा : जळगावकरांचे NHAI ला साकडं !

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला !
जळगाव

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला !

April 17, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळ साखळीचोरांचा धाडसी डाव; २५ ग्रॅम मंगळसूत्र लंपास !

April 17, 2026
एमआयडीसीत ‘अपहरण’चा थरार; प्रेमप्रकरणातून घडला प्रकार : मजुरांच्या सतर्कतेने अनर्थ टळला  !
क्राईम

एमआयडीसीत ‘अपहरण’चा थरार; प्रेमप्रकरणातून घडला प्रकार : मजुरांच्या सतर्कतेने अनर्थ टळला !

April 17, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !
जळगाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !
क्राईम

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
इंग्रजी नोटिसांचा गुंता सोडा, मराठीत संवाद साधा : जळगावकरांचे NHAI ला साकडं !

इंग्रजी नोटिसांचा गुंता सोडा, मराठीत संवाद साधा : जळगावकरांचे NHAI ला साकडं !

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला !

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला !

April 17, 2026
बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २२ लाखांहून अधिक रोकड व दागिने लंपास !

बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २२ लाखांहून अधिक रोकड व दागिने लंपास !

April 17, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळ साखळीचोरांचा धाडसी डाव; २५ ग्रॅम मंगळसूत्र लंपास !

April 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group