जळगाव मिरर / २५ फेब्रुवारी २०२३ ।
जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा बसावा व गुंडांपासून नागरीकांचे रक्षण व्हावे या हेतूने जळगाव शहरातील तीन गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस प्रशासनाकडून करण्यात आली आहे. विशाल मुरलीधर धाबाडे (२१), उदय रमेश मोची (१९), अभिषेक उर्फ बजरंग परशुराम जाधव (१९, सर्व रा. रामेश्वर कॉलनी) असे हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहे.
या तिन्ही गुन्हेगारांविरूध्द शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या तिघांचा हद्दपारीचा प्रस्ताव आल्यानंतर सदर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे प्रस्तावाची उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडून चौकशी करण्यात आली. त्या चौकशीत तिघांना वारंवार गुन्हे करण्याची सवयी असल्याचे निष्पन्न झाले. अखेर शुक्रवारी तिघांना जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले आहे.