• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

तीन महिन्यापूर्वी प्रेम विवाह अन नविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल !

माहेरकडील नातेवाईकांचा घातपात असल्याचा आरोप

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 13, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
तीन महिन्यापूर्वी प्रेम विवाह अन नविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १३ जुलै २०२३

सध्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक अनोळखी तरुण-तरूणींमध्ये मैत्री होवून प्रेम निर्माण होवून काही दिवसात विवाह सुध्दा होत असतात, पण यातील सर्वच प्रेमविवाह यशस्वी होतात असे नाही काहीचे काही दिवसात दुरावा निर्माण होतो तर काहींना वर्षभर लागतो तर काहींचे प्रेमविवाह शेवटच्या श्वासापर्यंत नाते टिकत असते, अशी एक घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात घडली असून तीन महिन्यापूर्वी चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी मंदिरात सात जन्म एकत्र राहण्याचे वचन घेतलेल्या प्रेमींनी अगदी तीन महिन्यातच 19 वर्षीय विवाहितेने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना उघडकीस आली आहे.

पाचोरा शहरातील कृष्णापूरी भागातील गोविंद नगरमध्ये तीन दिवसांपूर्वी राहण्यास आलेल्या १९ वर्षाच्या नवविहितेने घरामागे असलेल्या ५० फुट विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक धनंजय वेरुळे, पोलिस निरीक्षक राहुल खताळ, सहायक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, पोलिस उपनिरीक्षक विजया विसावे यांनी भेट दिली. पती पत्नीत किरकोळ वाद झाला व आजी सासू, सासू चुलत सासू त्रास देत असल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील रहिवासी असलेला राहुल चव्हाण याचा प्रेम विवाह लिहा तांडा ता. जामनेर येथील काजल राठोड हिच्याशी तीन महिन्यांपूर्वी झाला होता. कुऱ्हाड येथे नांदवयासाठी आल्यानंतर काजल हिस सुग्राबाई बद्री चव्हाण (आजी सासु), मुक्ताबाई रामधन चव्हाण (सासु), पार्वतीबाई चव्हाण (चुलत सासु) ह्या सतत टोचून बोलत असल्याने त्यांच्यात वाद होत असे. यामुळे राहुल व काजल हे १० जुलै रोजी सोमवारी पाचोरा शहरातील कृष्णापूरी भागातील गोविंद नगरमध्ये राहण्यासाठी आले होते.
राहुल व काजल यांच्यात बुधवारी दुपारी किरकोळ वाद झाला त्यानंतर काजल ही कुणास काही एक न सांगता घरातून निघून गेली. दरम्यान राहुलने तिच्या माहेरच्या व त्याच्या कुऱ्हाड येथील आई वडीलांना भ्रमणध्वनी द्वारे कळविल्यानंतर तिचे काका व चुलत भाऊ त्याच्या पाचोरा येथील घरी आले. मात्र राहुलच्या आई वडीलांनी तुमचे तुम्ही बघून घ्या असे सांगून येण्यास नकार दिला होता. काही तासांनंतर राहुल व काजल यांच्यात भ्रमणध्वनी द्वारे संपर्क झाला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार काजल ही रात्री दहा वाजता परत आल्यानंतर तिच्या जवळ जळगाव येथील येण्या जाण्याचे तिकिटे आढळून आले. काजल घरी आल्यावर राहुल याने त्याच्या घरच्यांना भ्रमणध्वनी द्वारे कळविले असतांना सासरच्या मंडळीचा बोलण्याचा रोष तीने भ्रमणध्वनी द्वारे ऐकल्यावर त्याचवेळी घरामागील पन्नास फुट खोल असलेल्या निमुळत्या विहिरीत उडी घेतली. यावेळी घरातील बसलेले तीचे पती राहुल व उपस्थितीत असलेल्या मंडळीला विहिरीत काही तरी पडल्याचा आवाज आला त्यांनी विहिरीजवळ जावून पाहिले असता विहिरीत काजल हिने उडी घेतल्याचे निष्पन्न झाले. विहीर अतीशय निमूळती व विहीरीचा व्यास कमी असल्याने तिच्या डोक्याला जबरी मार लागल्याने काजल हिचा जागेवरच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती कळताच रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने काजल हीस पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी काजल हीस मृत घोषित केले. काजल हिच्या वडीलांचे दहा वर्षांपासून निधन झाले असल्याने तिचे १२ वी पर्यंत शिक्षण व संगोपन तिच्या मालखेडा ता. जामनेर येथील मामाने पुर्ण केले. काजल हिचा पती राहुल राठोड हा पाचोरा येथील एका स्टाईलच्या दुकानात १५ हजार रुपये महिन्याने काम करीत होता. काजल ही त्यांच्या चुलत मामांची मुलगी आहे.
दरम्यान काजल हीस ५० हजार रुपये महिन्याचे दुसरे स्थळ चालून आल्याने तिच्या माहेरच्या मंडळींचे मत परिवर्तन झाल्याने त्यांनी दुसऱ्या मुलाशी विवाह लावून देण्याचे ठरविले होते. याची कानघून काजल व राहुल यांना लागल्याने दोघांनी ऐकमेकांशी संपर्क करुन दोघांनी तीन महिन्यांपूर्वी चाळीसगाव येथील पाटणादेवी येथे पळून जावून प्रेमविवाह केला होता‌. काजल हिच्या आईने पाचोरा येथे तिचा मृतदेह पाहिल्यावर एकच आक्रोश केला. मयत काजल हिचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजया विसावे ह्या करीत आहेत.

Related Posts

आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !
जळगाव

आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

July 15, 2026
प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !
क्राईम

प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !
जळगाव

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

July 15, 2026
जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय
जळगाव

जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

July 15, 2026
वाढदिवस साजरा होणार पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पाने; तुषार सैंदाणे यांच्या पुढाकारातून २०० वृक्ष लागवड
जळगाव

वाढदिवस साजरा होणार पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पाने; तुषार सैंदाणे यांच्या पुढाकारातून २०० वृक्ष लागवड

July 15, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

सोन्याच्या व्यवहारात मोठी फसवणूक; पोलिसांनी राजस्थानातून आरोपीला पकडले

July 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

July 15, 2026
प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

July 15, 2026
जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

July 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group