जळगाव मिरर / २४ फेब्रुवारी २०२३
फेब्रुवारी महिना संपण्यात आला असून खान्देशात उन्हाळा महिन्याला सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यात अनेक लोकांना आरोग्याविषयी अनेक तक्रारी असतात, त्यासाठी तुम्हाला उत्तम डॉक्टरांचा सल्ला हा घ्यावाच लागतो. प्रत्येकांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी जळगाव शहरात थायरॉईड रक्त तपासणी शिबीर ४ मार्च रोजी घेण्यात आले आहे.
शहरातील प्रसिद्ध मधुदत्त मॅटनिटी आणि नर्सिंग होम या ठिकाणी जळगावसह ग्रामीण भागातील नागरिकांचे थायरॉईड रक्त तपासणीचे शिबीर येत्या ४ मार्च २०२३ रोजी जळगावातील 38 वर्षापासून जळगाव शहरात अविरत सेवा देणारे डॉ.दिलीप दत्तात्रय राणे तर डॉ.श्रद्धा तेजस राणे या ठिकाणी मार्गदर्शनावाखाली एमडी मेडिसिन डॉ. तेजस दिलीप राणे करणार आहे. या शिबिराचे ठिकाण 47 मानश्री सरस्वती नगर नेरी नाका जवळ जळगाव याठिकाणी होत आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. या शिबिर सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत होणार असून उपाशी पोटी यावे असे आवाहन केले आहे. तर शिबिराची तपासणी फी केवळ ७० रुपये ठेवण्यात आली आहे.
