जळगाव मिरर | २५ मे २०२३
रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा येथील बसस्थानकाजवळ पाच टपऱ्यांना आग लागली. यात लाखोंचे नुकसान झाले आहे. ही घटना दि. २४ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली. आगीबाबत नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गावरील मोठे वाघोदे येथे विजय नथ्थू चौधरी यांच्या मालकीचे पान सेंटर आहे. यात झेरॉक्स मशीन, लॅपटॉप स्टेशनरी व इतर साहित्य आगीत जळून खाक झाले. यात अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गुलशन समशेर पठाण यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे टपरीसह साहित्य जळून खाक झाले तर मलक इमाम यांच सायकल दुरुस्तीची टपरी तसेच साहित्य जळून चाळीस हजार रुपयांच नुकसान झाले आहे. मधुकर भिकाज निंबाळकर यांची सलूनची टपरी आगी जळून खाक झाल्याने नुकसान झाल आहे. याबाबत इलाईस खा इस्मालखान यांनी सावदा नगरपालिकेल माहिती दिल्याने अग्निशामक बंब आले घटनेची माहिती मिळतात सावद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही उदरनिर्वाहाचे साधन आगीत भस्मसा झाल्याने गरीब टपरीचालकांव उपासमारीची वेळ आली आहे. त्यांन मदत मिळावी, ग्रामस्थांकडून होत आहे. अशी मागणी होत आहे.