• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

तोतया नवरोबाची कमाल : दोन बायका असतांना बांधली तिसरीशी गाठ !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 14, 2023
in क्राईम, राज्य
0
तोतया नवरोबाची कमाल : दोन बायका असतांना बांधली तिसरीशी गाठ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १४ मार्च २०२३ ।

आधीच दोघींना जाळ्यात ओढत आणि त्यांना गोडीगुलाबीने फसवत त्यांच्याशी शुभमंगल उरकले. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. एवढ्यावरच हा तोतया नवरोबा थांबला नाही. त्याने चक्क तिसऱ्याच मुलीवर इन्स्टाग्रामच्या माध्यमातून प्रेमाचे जाळे फेकले. तिच्याशी लगीनगाठ बांधली. पूर्वीच्या दोन पत्नींपैकी एकीने फसवणुकीची ही बाब पीडित तिसऱ्या पत्नीच्या कुटुंबीयांकडे सांगितली. त्यानंतर या नाट्यमय, गंभीर गुन्ह्याचे बिंग फुटले. याप्रकरणी उमरेड पोलिसांनी कुणाल उर्फ किरण महादेव शिंदे (२७, रा. हिवरा, जि. बीड) यास अटक केली आहे.

उमरेड येथील १९ वर्षीय फिर्यादी तरुणीच्या तक्रारीवरून उमरेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी किरण शिंदे याने जानेवारी २०२३ ला इन्स्टाग्रामवर पीडित तरुणीशी ओळख केली. मी पुणे आर्मी मेडिकल कोअर येथे क्लार्क पदावर असून, बक्कळ पगार असल्याचेही सांगितले. मी अनाथ आहे. अनाथालयात शिक्षण घेतले, अशीही थाप त्याने मारली. दोघांच्याही मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्याने लग्नाची मागणी घातली. पीडितेच्या कुटुंबीयांनी त्याला उमरेड येथे बोलावले.

२१ जानेवारी २०२३ ला साक्षगंधाचा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, मी जयपूर येथे आर्मीत असून, आता पुण्याला रुजू होणार असल्याचे सांगत या तोतयाने पीडितेच्या घरीच मुक्काम ठोकला. १२ फेब्रुवारी २०२३ ला एका मंदिरात लग्नही उरकविले. त्यानंतर पीडितेच्या नातेवाइकांकडेसुद्धा पाहुणचारासाठी निघाला. दरम्यान, पूर्वीच्या दोन पत्नींपैकी एका पत्नीला आरोपी किरण शिंदे हा उमरेड येथे असल्याचे कळले. तिने पीडितेच्या कुटुंबीयांना संपूर्ण प्रकार सांगितला. काही लोकांनी नातेवाइकाकडे पाहुणचार करणाऱ्या या नवरोबाला उमरेडला आणले.

उमरेड पाेलिसांनी आराेपीला अटक करीत त्याच्याविरुद्ध भादंवि १७०, १७१, ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४६९, ४७१, ४९४, कलमांन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर आज, सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी किरण शिंदे यास १६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद घोंगे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दिनेश खोटोले करीत आहेत.
किरण शिंदे नावाच्या या तोतया नवरोबाने पीडितेजवळ अनेक थापा मारल्या. पुणे येथे आर्मीत क्लार्क आहे. ६३ हजार रुपये वेतन मिळते. पुणे खडकवासला ५५ लाखांचा फ्लॅट आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे ५ एकर शेती असून, चंदन आणि सागवानाची झाडे आहेत, अशा अनेक थापा मारल्या. अनाथ असल्याचीही खोटी माहिती दिली. आरोपी केदार शिंदे याच्याविरुद्ध याआधीच ठाणे शहर आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या अंबरनाथ शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस यंत्रणेत कर्तव्यावर असल्याच्या भूलथापा देत त्याने या परिसरात लगीनगाठ बांधली. कालांतराने फसवणुकीचा प्रकार उजेडात आला. पोलिस असल्याचे सांगत त्याने याठिकाणी एका तरुणीला फसविले. पोलिसाचे खोटे ओळखपत्रसुद्धा याप्रकरणी जप्त करण्यात आले होते. फसवणुकीचा हा फंडा वापरताना आरोपी केदार शिंदे याने बोगस कागदपत्रांचा आधार घेतला. आर्मीचे खोटे अपाॅइंटमेंट लेटर आणि अन्य दस्ताऐवज पोलिसांनी जप्त केले आहेत.

Related Posts

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?
क्राईम

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर
क्राईम

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रक्षाबंधनानंतर माहेरी आलेल्या १९ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य; चाळीसगावात हळहळ

September 1, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

मीरा भाईंदर पोलिसांचा जळगावात ‘सर्जिकल स्ट्राईक’; ४.९ किलो एमडी जप्त, स्थानिक पोलिसांचे खबरी कुठे ?

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

August 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

रक्षाबंधनानंतर माहेरी आलेल्या १९ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य; चाळीसगावात हळहळ

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group