जळगाव मिरर | १२ डिसेंबर २०२३
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच अमरावतीमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अमरावीच्या दर्यापूर ते भातकुली मार्गावरील थिलोरी फाट्याजवळ मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात ट्रॅक्टरमधील ९ मजूर गंभीर जखमी झालेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या दर्यापूर ते भातकुली मार्गावरील थिलोरी फाट्याजवळ या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. मजुरांनी भरलेला ट्रॅक्टर शेतातून दर्यापुरकडे जात होता. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात ट्रॅक्टरमधील ३५ पैकी ९ जण गंभीर जखमी झालेत. जखमींना तातडीने दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामधील काही मजुरांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर करण्यात आले आहे.