जळगाव मिरर । ४ नोव्हेबर २०२५
कंपनीच्या बाहेर टपरीवर अवैधरित्या दारु विकणाऱ्या राहुल बहऱ्हाटे याने परप्रांतीय कामगारांवर गोळीबार केल्याची घटना रविवारी रात्री साडेदहा वाजता एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये घडली होती. यामध्ये राजन शेख रफिउल्ला (वय २०, मुळ रा.आझमगड, उत्तरप्रदेश) हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असतांना सोमवारी दुपारच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. गोळबार करणाऱ्या संशयित राहूल बऱ्हाटे याच्यावर यापुर्वी हद्दपारीसह एमपीडीएची कारवाई केली होती. त्यामुळे आता जळगाव एमआयडीसीतील कामगार सुरक्षित नसल्याचे आता निर्देशनास येत आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मूळचे उत्तरप्रदेशातील रहिवासी असलेले फिरोज शेख, राजन शेख व इतर गावातील काही मजूर हे एमआयडीसीतील जी १४ सेक्टरमधील विजेते कंपनीत काम करतात. त्यांच्या कंपनीपासून काही अंतरावर राहुल बऱ्हाटे याची पानपटरी असून तो तेथे अवैधरित्या दारु विक्री करीत होता. तसेच या परिसरातील कंपनीत काम करणाऱ्यांना कामगारांना वारंवार त्रास देत होता. रविवारी रात्री १० वाजता सरफू अहमद हा पुडी घेण्याकरीता त्याच्याकडे गेला असता, त्याला राहुलने मारहाण केली. त्यावेळी सरफू याने बाबतची माहिती कंपनीचे व्यवस्थापक मोहम्मद अफजल जलाऊद्दीन उर्फ सोनु यांना दिली. त्यानुसार व्यवस्थापक सोनु यांच्यासह फिरोज, राजन, सरफु, सलीम आणि संजय हे सर्व जण राहुलला समजावून सांगण्यासाठी त्याच्या पानटपरीवर गेले. यावेळी राहुलने फोनवर ‘लवकर या, हे सर्व एकत्र आले आहेत,’ असे बोलून इतरांना बोलावून घेतले.
व्यवस्थापक राहुल बहऱ्हाटे याला समजावत असतानाच राहुलची पत्नी मोनाली स्कूटरवर तेथे आली. राहुल बनाउटे पळत तिच्याकडे गेला आणि तिच्यकडून कतीतरी वस्तू घेऊन परजला, कामगारांना धमकावत त्यारे, ‘तुम युपी वालोको बहोत मस्ती है, आज तुम्हे निया छोड्डुंगा’ असे मागत सरफु अहमद याणावर पिस्तूल रोखून अचानक गोलीबार केला. संशयित राहुल बन्नाटे याचा नेम चुकल्याने बोली सरपुरता लागली नाही अन् तो तिथून पळून गेला मात्र त्यानंतर त्याने फिरोज लेखापरी ज्यमुळे फिरोज खाली कोसळला, एवढ्यावरच न थांबता राहुलने राजन रोख पाच्याही पोटावर गोजीचार केला. येची खाली कोसळलाच राहुत अणि त्याची पत्नी मोनाली स्कूटरवर बसून घटनास्थानावरून पळून गेले.



















