जळगाव मिरर | २० ऑगस्ट २०२६
शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत परवाना नसतांना रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टवर छापा टाकून ताब्यात घेतले. ही कारवाई परिक्षाविधीन उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले यांच्या पथकाने यांनी बुधवार दि. १९ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठलाही परवाना किंवा पदवी नसतांना बनावट डॉक्टरकडून रुग्णांवर उपचार केले जात होते. याबाबतची माहिती परिक्षाविधीन उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले यांना मिळाली. त्यानुसार बुधवार दि. १९ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून रात्री ८ वाजेच्या सुमारास रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टवर छापा टाकला. पोलिसांनी संशयित बोगस डॉक्टरला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी डॉक्टरविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
पोलिसांच्या पथकाने अचानक बोगस डॉक्टरमधून रुग्णांवर उपचार करणाऱ्यावर छापा टाकल्यामुळे एकच खळबळ माजून गेली होती. डॉक्टरच्या घरातून उपचारासाठी लागणारे साहित्य व औषधी देखील जप्त केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.




















