जळगाव मिरर | ४ जून २०२५
जळगाव शहरातील एका परिसरात हद्दपार असतांना देखील निशांत प्रताप चोधरी (वय २०) व मनिष भगवान सपकाळे (वय २३) हे दोघ धारदार चॉपर घेवून दहशत माजवितांना मिळून आले. सोमवारी शनिपेठ पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील डीएनसी महाविद्यालय परिसरातील शंकरराव नगरातील निशांत चौधरी याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. हद्दपार असतांना देखील तो दि. २ रोजी तो त्याचा मित्र मनिष भगवान सपकाळे याच्यासोबत चॉपर घेवून शहरात हदशत माजवित होता. शनिपेठ पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करीत धारदार चॉपर हस्तगत केला आहे. त्यांच्यावर हद्दपारीचे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक प्रिया दातीर या करीत आहे
