बातमीदार | १६ ऑगस्ट २०२३
देशातील प्रत्येक व्यक्तीचे लक्ष मिशन चांद्रयानकडे लागले असून चांद्रयान 3 च्या बाबतीत आतापर्यंत सगळ ठरवलंय तसं नियोजनानुसार सुरु असून मिशन चांद्रयान ३ साठी आजचा आणि उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. इस्रोकडून चांद्रयान 3 वर आज महत्त्वाच मॅन्यूव्हर परफॉर्म करण्यात आलं. सध्या डी-ऑर्बिटिंगची प्रोसेस सुरु आहे. म्हणजे चांद्रयान 3 मिशन सुरु झालं, तेव्हा यानाची पृथ्वीपासूनची कक्षा टप्याटप्याने वाढवण्यात आली. आता डी-ऑर्बिटिंगमध्ये चांद्रयान 3 ची कक्षा टप्या टप्याने कमी केली जात आहे, चांद्रयान 3 ला चांद्रभूमीच्या अधिक जवळ आणलं जात आहे. आज चांद्रयान 3 ला चंद्राच्या आणखी जवळ नेण्यात आलं. चांद्रयान 3 वर चंद्राच्या कक्षेतील सर्व मॅन्यूव्हर पूर्ण झाले आहेत.
Chandrayaan-3 Mission:
Orbit circularisation phase commencesPrecise maneuvre performed today has achieved a near-circular orbit of 150 km x 177 km
The next operation is planned for August 16, 2023, around 0830 Hrs. IST pic.twitter.com/LlU6oCcOOb
— ISRO (@isro) August 14, 2023
आज चांद्रयान 3 ला 153km x 163km कक्षेत स्थापित करण्यात आलं आहे. ही नियोजित कक्षा होती असं इस्रोकडून टि्वटकरुन सांगण्यात आलं. त्यानंतर उद्या प्रोप्लजन मॉड्युलपासून लँडिंग मॉड्युल वेगळ होईल. या लँडिंग मॉड्युलमध्ये विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंगच्या दृष्टीने चंद्राच्या कक्षेत आज आणि उद्या घडणाऱ्या या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. येत्या 23 ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लँडिंगची इस्रोची योजना आहे.चांद्रयान 3 खूप महत्त्वाच मिशन असून आमच्या सगळ्यांसाठी सॉफ्ट लँडिंग महत्त्वाची आहे असं इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी मंगळवारी सांगितलं. प्रोप्लजन मॉड्युलपासून लँडिंग मॉड्युल 17 ऑगस्टला वेगळं होईल. त्यानंतर लँडिंग मॉड्युलला एलिप्टिकल ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यासाठी इस्रोकडून मॅन्यूव्हर करण्यात येईल.