बोदवड – प्रतिनिधी
इतर मतदारसंघात मतदानातून एक आमदार निवडला जाणार आहे परंतु मुक्ताईनगर मतदासंघांत तुम्ही तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीला मतदान करून दोन आमदार निवडणार आहात असे प्रतिपादन रोहिणी खडसे यांनी बोदवड येथिल जाहीर सभेत केले
तुमच्या मतदानाने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणारं आहे आणि सरकार आल्या नंतर रविंद्र भैय्यासाहेब पाटिल यांना विधानपरिषदचे आमदार बनवण्याचे आश्र्वासन पक्षाच्या वरिष्ठांनी दिलेले आहेआणि आपण सुद्धा त्यासाठी पक्ष श्रेष्ठींकडे आग्रह धरणार आहे म्हणून आपले एक एक मत महत्वाचे असुन तुतारी वाजवणारा माणूस या निशाणी समोरील बटण दाबुन मतदान रूपी आशीर्वाद देण्याची त्यांनी उपस्थितांना विनंती केली
मुक्ताईनगर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ बोदवड येथिल गांधी चौकात माजी महसुल मंत्री आ एकनाथराव खडसे, जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटिल, विशाल खोले महाराज यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ॲड रोहिणी खडसे बोलत होत्या त्या म्हणाल्या बोदवड तालुक्याने कायम शरद पवार साहेबांवर निष्ठेने प्रेम केलेले आहे ते प्रेम कायम ठेवा अशी विनंती करायला मी आले आहे राज्यातील शेतकरी कष्टकरी सामान्य जनतेच्या विरोधी असणारे महायुती सरकार बदलवून जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी शरद पवार साहेब राज्यभर प्रचार सभा घेत आहेत म्हणून आपले एक एक मत महत्वाचे आहे.
तुमच्या मतदानाने राज्यात महाविकास आघाडीचे येणार आहे सरकार आल्या नंतर जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटिल यांना विधानपरिषद वर आमदार बनवण्याचे आश्र्वासन पक्षाच्या वरिष्ठांनी दिलेले आहे लोकसभा निवडणूक प्रचारावेळी मुक्ताईनर येथिल जाहीर सभेत प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेबांनी सुद्धा तसा शब्द दिलेला आहे म्हणून आपले एक एक मत महत्वाचे असुन आपण तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीला दिलेल्या मतदानाने राज्यात पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे सरकार येऊन दोन आमदार मिळणार असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले सांगुन आपल्या तुतारी वाजवणारा माणूस या निशाणी समोरील बटण दाबुन मतदान रूपी आशीर्वाद देण्याची त्यांनी विनंती केली पुढे बोलताना त्या म्हणाल्या विद्यमान आमदारांनी मागील निवडणुकीत आश्र्वासने दिलीत परंतु निवडून आल्यावर एकही आश्र्वासन त्यांनी पाळले नाही मतदारसंघातील शेतकरी कष्टकरी तरुणांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठवला नाही
आम्ही गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सरकारला निवेदने दिली, आंदोलने केली परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत असंवेदनशील सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत आज मतदारसंघातील काही गावांमध्ये आमच्या बदनामी साठी पत्रक वाटण्यात आले आहेत त्यामध्ये वर्तमानपत्रात आलेल्या एका बातमीच्या कात्रणाची “रोहिणी खडसे पोलिसांच्या ताब्यात” एवढी हेडलाईन फक्त छापण्यात आली आहे परंतु पत्रक छापणाऱ्यांनी ती पुर्ण बातमी छापायला हवी होती
ती बातमी जुन 2023 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा जळगांव दौऱ्यावर आले होते त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शेतकऱ्यांच्या कांदा,कापुस, केळी पिकाला योग्य भाव मिळावा , पिक विमा मिळावा, विज बिल माफ व्हावे अशा मागण्या करण्यात आल्या होत्या त्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनात मुख्यमंत्री महोदयांना काळे झेंडे दाखवण्याचे आंदोलन करण्यात आल्यामुळे मला आणि इतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती ही त्यासंबंधीच्या बातमीची हेडलाईन आहे
शेतकऱ्यांचे प्रश्न मांडल्या मुळे मला अटक झाली त्याचा मला अभिमान आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणे चुकीचे आहे का?
शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले म्हणजे गुन्हा केला का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मला अटक होत असेल तर मी शंभर वेळा अटक व्हायला तयार आहे
अटक झाली तरी मी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत राहिल असे प्रतिपादन रोहिणी खडसे यांनी केले
पंधरा दिवसांपूर्वी प्रचारासाठी आम्ही बोदवड तालुक्यात आलेलो असताना शेतकरी बांधवांनी शेतीच्या बांधावर येऊन लाल्या रोगामुळे कपाशीचे झालेले नुकसानीची पाहणी करण्याची विनंती केली होती त्यावेळी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान बघुन मन विषण्ण झाले होते शेतातून निघून तहसिल कार्यालयात गाठून निवडणूक आचार संहिता बाजुला ठेवून शेतकऱ्यांचे लाल्या रोगामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार यांना दिले होते
त्यावर विरोधकांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून रोहिणी खडसे यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली हे शेतकऱ्यांना आर्थिक प्रलोभन दाखवण्या सारखे आहे म्हणून निवडणूक आयोगाने रोहिणी खडसे यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी केली आहे
शेतकऱ्यांच्या सुख दुःखात सहभागी होणे त्यांचे प्रश्न मांडणे गैर आहे का?
शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणे या मतदारसंघात गुन्हा आहे का?
तुम्हाला लोकांनी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी निवडून दिले तरी तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत नाहीत आम्ही ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतो तर आम्हाला याप्रकारे त्रास देणे योग्य आहे का असा प्रश्न रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला
विरोधक तिस वर्षात काय केले असे विचारताच तिस वर्षात काय केलें हे सर्वांच्या समोर आहे
परंतु विरोधक पाच वर्षात काय केले मुख्यमंत्र्यानी सांगितलेला पाच हजार कोटी रुपये निधी कुठे गेला या प्रश्नाला बगल देतात
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महीला, तरुण, शेतकरी, सर्व सामान्यांसाठी विकासाची पंचसूत्री कार्यक्रम राबविण्यात येणार आहे म्हणून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणायला आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मतदानरूपी आशिर्वाद देण्याची विनंती रोहिणी खडसे यांनी केली
यावेळी माजी मंत्री आ एकनाथराव खडसे , रविंद्र भैय्यासाहेब पाटिल , विशाल खोले महाराज,डॉ सुधिर पाटिल, दिपक झांबड, ॲड मनोहर खैरनार, डॉ जगदिश पाटिल यांनी मतदारसंघात गेल्या पाच वर्षात विकासाचा बट्ट्याबोळ झालेला असुन भ्रष्टाचार , गुंडगिरी वाढली आहे हे सर्व रोखण्यासाठी
मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी शेतकरी कष्टकरी महिला युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी जनहिताची तळमळ असणाऱ्या उच्चशिक्षित सुसंस्कृत ॲड रोहिणी खडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे उपस्थितांना आवाहन केले
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते, आणि मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.