जळगाव मिरर | २१ फेब्रुवारी २०२५
शहरातील वेगवेगळ्या परिसरातून दुचाकी चोरुन नेणाऱ्या संशयित आकाश सुरेश शिंदे (वय १९, रा. साईनगर, कुसुंबा, ता. जळगाव) व सुरज मुनेंन्द्र दिवेव्दी (वय २२, रा. एमआयडीसी सेक्टर डी) या दोघ चोरट्यांच्या एमआडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरलेल्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालाजी मंदिर परिसरातून दि. १ रोजी रात्रीच्या सुमारास सिद्धार्थ दीपक शर्मा यांची तर दुसऱ्या घटनेत शिरसोली रस्त्यावरील रॉयल ट्रर्फ येथून दि. १४ रोजी साईरस महेश बोंडे रा. किसनराव नगर, गिरणा पंपिंग रोड रामानंद नगर यांची दुचाकी चोरुन नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयित हे चोरीची दुचाकी घेवून फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली.
त्यांनी गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सफौ दत्तात्रय बडगुजर, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, किशोर पाटील, प्रदीप चौधरी, योगेश बारी, सिद्धेश्वर डापकर, शशिकांत मराठे, नितीन ठाकूर, राहूल घेटे, रतन गिते, छगन तायडे, किरण पाटील, ललित नारखेडे, विशाल कोळी यांचे पथक तयार करुन रवाना केले. या पथकाने दुचाकी चोरुन नेणाऱ्या संशयित आकाश सुरेश शिंदे (वय १९, रा. साईनगर, कुसुंबा, ता. जळगाव) व सुरज मुनेंन्द्र दिवेव्दी (वय २२, रा. एमआयडीसी सेक्टर डी) या दोघ चोरट्यांच्या मुसक्या आवळून जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरलेल्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.