जळगाव मिरर / १६ फेब्रुवारी २०२३ ।
चाळीसगाव शहरानजीक नांदगाव रोडवर शहरालगत असलेल्या पाटखंडकीजवळ दोन दुचाकीच्या समोरासमोरा झालेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही चाळीसगाव पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत कुठल्याही प्रकारची नोंद नव्हती.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, योगेश आनंदा जाधव (४७) व विजय नारायण सोनजे (६३, दोघे नांदगाव) हे दोघे त्यांच्या दुचाकीने नांदगावहून घटना १५ रोजी दुपारी घडली आहे. चाळीसगावकडे येत असता समोरुन चाळीसगावकडून नांदगावकडे नाना रामचंद्र वाघ (५८, परधाडी, ता. नांदगाव) हेदेखील दुचाकीने जात होते. तालुक्यतील पाटखडकी गावाजवळ साईनाथ पेट्रोल पंपाच्यासमोर दोघांच्या दुचाकीची समोरासमोर जबरदस्त धडक झाली.
वाघ याना जबर मार लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दुचाकीच्या मागे बसलेले विजय नारायण सोनजे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात दुचाकीचा पुढील भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. या अपघातात आहे. याबाबत पोलिस ठाण्यात योगेश आनंद जाधव व नाना रामचंद्र कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती.
