अमळनेर : विक्की उत्तम जाधव
शहरातील एका परिसरातून एका इसमाची दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी अमळनेर पोलिसात अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील पुष्पकुज खडाजीन परिसरातील रहिवासी प्रदीप गोपाळराव भांडारकर यांची दि २० फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री अनोळखी चोरट्यांनी वाडी चौक गंगामाई मंदिरासमोरून दुचाकी एम.एच.१९.ए.एल.२८६३ चोरून नेली आहे. या प्रकरणी त्यांनी अमळनेर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ. चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.