• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

काका बाळासाहेब : राज ठाकरेंच्या लेखातून उलगडले भावनिक नाते

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 23, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
काका बाळासाहेब : राज ठाकरेंच्या लेखातून उलगडले भावनिक नाते
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ जानेवारी २०२६

हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादनाचा वर्षाव होत आहे. राजकीय नेते, कलाकार, क्रीडापटू तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांनी दैनिक **‘सामना’**साठी एक भावस्पर्शी विशेष लेख लिहिला आहे. ‘माझे काका…’ या शब्दांनी लेखाची सुरुवात करत राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या वैयक्तिक आठवणी, अनुभव आणि त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखवले आहेत. या लेखातून बाळासाहेब ठाकरे हे केवळ एक करारी राजकीय नेते नव्हते, तर कुटुंबासाठी, जवळच्या माणसांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी ते कसे होते, याचे हृदयस्पर्शी चित्रण करण्यात आले आहे.

राज ठाकरे यांनी या लेखासोबतच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरूनही एक खास पोस्ट शेअर करत काकांविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. बाळासाहेबांच्या स्पष्टवक्तेपणा, निर्भय स्वभाव आणि महाराष्ट्रावर असलेल्या अपार प्रेमाचा त्यांनी विशेष उल्लेख केला आहे. बाळासाहेबांकडून मिळालेली शिकवण, त्यांचे विचार आणि जीवनमूल्ये आपल्या आयुष्यावर कशी कोरली गेली, हेही राज ठाकरे यांनी सूचक आणि भावनिक शब्दांत मांडले आहे.

राज ठाकरे यांनी केलेली पोस्ट देखील पहा….

स्व. बाळासाहेबांची आज १०० वी जयंती. इतिहासात जन्म शताब्दी वर्ष अनेकांची साजरी झाली आहेत आणि होतील देखील, पण एखादी व्यक्ती हयात नसताना देखील ती लोकांच्या स्मृतीत रहावी, आणि त्या व्यक्तीने आज देखील एखाद्या प्रांताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देत रहावं हे दुर्मिळ. हे फक्त बहुदा बाळासाहेबांच्या बाबतीतच घडू शकतं. आणि म्हणूनच बाळासाहेब १०० वर्षांनीच काय पण त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची मला पूर्ण खात्री आहे. फक्त तेंव्हा मात्र बाळासाहेबांचं स्मरण करणारा मराठी माणूस हा दुभंगलेला, खचलेला, पिचलेला आणि अन्याय मुकाट्याने सहन करणारा नसावा. आज निष्ठा सहज विकल्या जातात. तत्व सहज फेकून दिली जातात, आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झालं आहे. आज राजकारणातलं यश हे कुठले मुद्दे ऐरणीवर आणले, प्रांतिक, भाषिक अस्मिता किती धगधगती ठेवली यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणात किती यश मिळालं आणि त्यासाठी काय क्लुप्त्या वापरल्या यावर मोजलं जातं. बाळासाहेबांच्या काळात या असल्या अपेक्षांच्या फूटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्या त्यांनी झुगारून दिल्या असत्या. त्यांना स्वतःला सत्तेचं अप्रूप नव्हतं पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावर बसवण्याचं समाधान मात्र त्यांना मिळालं . सत्ता येते जाते. आजचे सत्ताधीश उद्या एखाद्या नामफलकापुरते राहतात पण काही पिढ्या झपाटून टाकतील असा प्रभाव फार थोडे लोकं टाकू शकतात. हा प्रभाव हीच बाळासाहेबांची शक्ती राहिली आणि हाच त्यांचा वारसा. बाळासाहेब दूरदर्शी होते. त्यांचा दृष्टिकोन आजही सुसंगत वाटतो आणि भविष्यातही राहील. त्यामुळेच ते कालातीत राहातील. बाळासाहेबांसारखी प्रतिभा परत कधी बघायला मिळणार नाही हे जितकं खरं आहे तितकंच बाळासाहेबांसारखं राजकारण करणं यापुढे कोणालाच जमणार नाही हे देखील खरं आहे. पण त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्यांनी मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी उभारलेला लढा हा मात्र धगधगत राहील, हे पाहणं बाळासाहेबांच्या पुढच्या पिढ्यांच्या हातात आहे. आणि ते आम्ही नेटाने करू हा आमचा मराठी माणसाला शब्द आहे. राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभर पण कमी झालं नाही, उलट ते अधिकच दृढ होत गेलं. हेच संस्कार आमच्यावर आहेत. मी एक शब्द आज पुन्हा देतो की, आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थसाठी कधीही नसेल. बाळासाहेबांचं मराठी भाषेवर, मराठी प्रांतावर आणि मराठी माणसावर असलेलं जाज्वल्य प्रेम पाहून जी हजारो लाखो लोकं त्यांच्यासोबत येत गेली त्यातला मी एक आहे. त्यामुळे ‘बाळासाहेब’ आणि ‘मराठी’ या दोन शब्दांवरची माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा , प्रेम तसूभर पण कमी होणार नाही. स्व. बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन ! राज ठाकरे ।

Related Posts

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!
जळगाव

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव
जळगाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!
क्राईम

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026
तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!
क्राईम

तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!

September 9, 2026
पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई
क्राईम

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group