जळगाव मिरर | १५ फेब्रुवारी २०२४
सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये नुकताच वसंत पंचमी उत्सव साजरा करण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी गीत, नृत्य व भाषणाच्या माध्यमातून आपल्या कलागुणांचे सादरीकरण करून प्रेक्षकांचे मन मोहून घेतले.
भारत देशात विविध सण-उत्सव साजरे केले जातात. धार्मिक बाबी व ऋतू लक्षात घेऊन येथील प्रत्येक सण-उत्सव साजरे केले जातात. यापैकीच वसंत पंचमी हा एक सण आहे. वसंत पंचमीला देवी सरस्वतीचा जन्म झाल्याचे मानले जाते, त्यामुळे या दिवशी सरस्वती देवीचे पूजन केले जाते.
या अनुषंगाने वसंत पंचमी पर्व जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी स्कूलमध्ये विराजमान असेलल्या देवी सरस्वतीच्या मूर्तीचे पूजन व माल्यार्पण करून वंदना करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. समूह गीत व नृत्य सादर करण्यात आले. भाषणातून वसंत पंचमी पर्वावर प्रकाश टाकण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी सहकार्य केले. तसेच सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे संचालक श्री. श्रेयसजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.