जळगाव (प्रतिनिधी) : ज्ञानदात्री सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षी दि. १२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता हरेश्वर हनुमान मंदिर, रामेश्वर कॉलनी येथे विचार वारसा फाऊंडेशनतर्फे विविध क्षेत्रात व्यक्तीमत्वाचा ठसा उमटविणाऱ्या कर्तबगार महिलांचा गौरव होणार आहे.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. सदर कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत व संघर्ष करून कुटुंबाचा गाडा यशस्वीपणे चालविणाऱ्या महिलांना सन्मानित केले जाणार आहे. उपक्रमासाठी प्रकल्पप्रमुख म्हणून जगतगुरु महिला बचत गट अध्यक्ष सौ.अलका राजेंद्र देशमुख हे काम पाहत आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन विचार वारसा फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल देशमुख, आशिष राजपुत, मयूर डांगे, मनिष चौधरी, ऋषिकेश राजपूत, निखिल शेलार, संकेत म्हसकर, गौरव डांगे, अमोल ढाकणे, आकाश तोमर, राहुल पाटील,चेतन राजपूत, अजय मांडोळे, मंगेश मांडोळे, सोपान जाधव, प्रफुल सूर्यवंशी, प्रेम बडगुजर, तेजस पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते करीत आहे.