
बीड : दादासाहेब नन्नवरे
राज्यातील बीड जिल्ह्यातील युवा नेतुत्व विजयकुमार राठोड हे व्यक्तिमत्व, जन्मापासून कोणताही शैक्षणिक अथवा राजकीय वारसा नसलेलं गरीब कुटूंबातील शेतकरी घराण्यातील गेली अनेक दिवसांपासून आपली नोकरी करत कर्मचारी अधिकारी व सर्वसामान्यांची जाण असल्यामुळे या सर्वांच्या अडीअडचणी जिल्हा ,तसेच राज्यापर्यंत सोडवणूक करण्याचा त्यांचा हातखंडा असल्याने राज्यातील अनेक अधिकारी असो किंवा पदाधिकारी असो यांच्यापर्यंत पोहचून ते प्रश्न सोडवत असतात.राज्यातील सर्व अधिकारी व लोकप्रतिनिंधीशी व कर्मचारीशी त्यांचा खूप मोठा दांडगा जनसंपर्क आहे.
या सर्वांची दखल घेऊन त्यांची राष्ट्रीय विमुक्त घुमन्तु जनजाति महासभा च्या राष्टीय अध्यक्ष (कर्मचारी अधिकारी प्रकोष्ठ )पदी एकमताने निवड करण्यात आली ही निवड राष्ट्रीय विमुक्त घुमन्तु जनजाति महासभा चे राष्टीय अध्यक्ष श्री श्रीपाल सिंह नायक यांनी गुजरात येथून केली. निश्चितच ही बाब बीड जिल्हा वासीयांनसाठी भूषणावह आहे याचे सर्वत्र कौतुक होत आहे.






















