• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

गावांमध्ये सामूहिक प्रयत्नातून ग्रामविकास शक्य – चैत्राम पवार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 3, 2024
in जळगाव ग्रामीण
0
गावांमध्ये सामूहिक प्रयत्नातून ग्रामविकास शक्य – चैत्राम पवार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ फेब्रुवारी २०२४

कोणत्याही गावाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर संपूर्ण गावाने संघटितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. सामूहिक प्रयत्नातूनच गावाचा विकास शक्य आहे, असे मत बारीपाडा गावाचे सुपुत्र चैत्राम पवार यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी महामंडळाचे मराठी वाङ्मय मंडळ अमळनेरद्वारा आयोजित 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ‌‘ग्रामीण विकासाचे अर्थकारण व नियोजन’ या विषयावर चैत्राम पवार यांनी मुलाखतीत व्यक्त केले.
सभामंडप क्रमांक दोनमध्ये ही मुलाखत झाली. ज्येष्ठ पत्रकार आणि ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकांत घासकडबी यांनी ही मुलाखत घेतली.

धुळे जिल्ह्यातील बारीपाडा या 300 घरांची वस्ती असलेल्या गावाचा चैत्राम पवार यांनी सर्वांगीण विकास केला. ग्रामीण विकासाचे अर्थकारण व नियोजन हा विषय साहित्याशी संबंधित नसला तरी समाजाशी संबंधित आहे म्हणूनच घेतला आहे, असे मुलाखतकाराने आधीच स्पष्ट केले.

वृक्षतोड करणाऱ्यांना दंड

जंगल, जल, जमीन, जन व जनावर ही पंचसूत्री स्वीकारून गावाचा विकास करण्याला प्राधान्य दिले आहे, असे चैत्राम पवार म्हणाले. गावात आधी व्यसन तसेच वृक्षतोडीचे प्रमाण जास्त होते, ही बाब लक्षात घेऊन गावाच्या गरजा काय आहेत, हे आधी पाहिले. नांदेडचे एक डॉक्टर बारीपाडा गावात आले आणि त्यांनी वनवासी कल्याणाश्रमाचे आरोग्य केंद्र गावात सुरू केले. एवढ्या लांबून येऊन एखादा माणूस गावाचे आरोग्य जपण्यासाठी येतो, तर मग आपण गावातच गावाचा विकास का करू शकत नाही, ही बाब ध्यानात घेतली. गावातील वनांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही गावकऱ्यांसोबत एकत्र बसून काही नियम केले. कोणी झाडे तोडताना आढळल्यास त्याला दंड करणे, तो कोणीही असो. अशाच एका प्रसंगात वनविभागाच्या कर्मचाऱ्याने वृक्षतोड केली. तेव्हा त्यालाही चार हजार रुपये दंड केला. पकडून देणाऱ्यासही 501 रुपये बक्षीस जाहीर केले. वृक्षतोड बंद केल्यामुळे घरातील चूल कशी पेटवायची, असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला, तेव्हा 20 वर्षांपूर्वी एलपीजी गॅस आणला. यानंतर आयआयटी पवई येथून सौर उर्जेवरचे कुकर विकसीत केले. तसेच गावात धूरविरहीत चूलही विकसीत केली. गावात आजही चार प्रकारच्या चुली आहेत.

वनसंवर्धनासाठी 2003 मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाला. शासकीय योजनांच्या मागे न पळता, आम्ही गावाचा विकास केला. वनसंवर्धन करताना झाडांना कोणतीही हानी पोहोचू दिली नाही. मोहाची फुले वेचताना खाली वाकावे लागते. यातून कंबरेला त्रास होतो. म्हणून मोहाच्या झाडांना नेट लावले.

कोंबडी एकप्रकारे ‌‘एटीएम’च

पारंपरिक शेतीच्या पलीकडे शेती सुधार प्रकल्प गावात राबविला. नगदी पिकांऐवजी दैनंदिन गरजा भागविणाऱ्या पिकांवर भर दिला. बारीपाड्यातील शेतीवर जर्मनीतील एका प्राध्यापकाने पीएच.डी. केली आहे. शेती उत्पन्नातून पुढे शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली. पारंपरिक बियाणे बाहेरुन मागविण्यापेक्षा स्थानिक बियाण्यांवर भर दिला. पशुपालनालाही प्राधान्य दिले आहे. कोंबडी आमच्या दृष्टीने ‌‘एटीएम’ आहे. एक कोंबडी बाजारात नेली तर ती विकून 500-600 रुपये मिळतात.

अनियमित शिक्षकालाही केला दंड

गावात शाळा होती पण शिक्षक कधी तरी 15 दिवसातून एक वेळा यायचे. ही बाब गावकऱ्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी या शिक्षकाला जाब विचारला, तेव्हा विद्यार्थी येत नाही, असे या शिक्षकाचे म्हणणे होते. नंतर या शिक्षकालाही दंड केला.
बारीपाडा आज इतर गावांना पुरवतेय पाणी

1100 एकरमध्ये वनसंवर्धनाचे काम झाले आहे. श्रमदानातून ग्रामस्थांनी 485 वनबंधारे बांधले. यातून परिसरातील शेतीला लाभ होतोय. एकेकाळी पाणीटंचाईचा सामना करणारे बारीपाडा गाव आज परिसरातील पाच गावांना पाणीपुरवठा करते. पावसाळ्यात 7.8 फुटांवर विहिरींना पाणी असते, तर इतर वेळेस 15-20 फुटांवर पाणी असते.

शाश्वत विकास करायचा असेल तर घरात वर्षभराचा अन्नसाठा पाहिजे. जैवविविधतेसाठी वनभाजी महोत्सवाचे आयोजन केले जाते. 18 वर्षांपासून हा महोत्सव सुरू आहे. आताच्या वनभाजी महोत्सवात 218 महिलांनी नावे नोंदणी केली आहे. यात 110 वनभाज्या होत्या. गावात स्त्री-पुरुष समानता आहे. गावात एकही कुटुंब भूमीहिन नाही. गावातील प्रश्न गावातच सोडवले जातात.

आपण ज्या गावात राहतो, त्या गावासाठी आपण काय करू शकतो, याचा आजच्या युवकांनी विचार केला पाहिजे, असा सल्ला चैत्राम पवार यांनी युवकांना दिला. यावेळी साहित्यप्रेमी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: #amalnerAkhil bhartiya marathi sahitya samhelanchaitram pawargram vikas

Related Posts

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !
जळगाव

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

August 1, 2026
मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद
क्राईम

मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

August 1, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

एलसीबी-एमआयडीसी पोलिसांचा एमडी तस्करीवर घणाघात; एक जेरबंद, ३.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

August 1, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

खंडणीसाठी रचला सैतानी डाव; दुचाकीत एमडी ठेवून नातेवाईकाला अडकविण्याचा प्रयत्न

August 1, 2026
पावसाच्या सरींमध्ये तांबापुरात अग्नितांडव; शॉर्टसर्किटमुळे तीन दुकाने जळाली !
क्राईम

पावसाच्या सरींमध्ये तांबापुरात अग्नितांडव; शॉर्टसर्किटमुळे तीन दुकाने जळाली !

August 1, 2026
सूडाच्या भावनेतून मेहुण्यावर दगडाने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू
क्राईम

सूडाच्या भावनेतून मेहुण्यावर दगडाने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू

August 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

August 1, 2026
मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

August 1, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

एलसीबी-एमआयडीसी पोलिसांचा एमडी तस्करीवर घणाघात; एक जेरबंद, ३.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

August 1, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

खंडणीसाठी रचला सैतानी डाव; दुचाकीत एमडी ठेवून नातेवाईकाला अडकविण्याचा प्रयत्न

August 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group