जळगाव मिरर । १३ ऑक्टोबर २०२५
चाळीसगाव शहरातील छाजेड ऑईलमिलच्या पाठीमागे घाटरोड ते हुडको त्रिमूर्ती बेकरीकडे जाणाऱ्या रोडवर एक व्यक्ती गावठी पिस्तूल व अग्निशस्त्र घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मयुर राजू मोरे, रा. प्रभात गल्ली, चाळीसगाव यास थांबवून विचारपूस करत त्याची झाडाझडती घेतली असता ३२ हजार रुपये किंमतीची गावठी बनावटीची पिस्तूल व २ राऊंड हस्तगत करण्यात आली.
शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१२ रोजी पहाटे सुमारे २.२० वाजता ही कारवाई करण्यात आली असून पोउपनिरीक्षक गणेश सायकर, पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केली. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी व समाजातील विघातक घटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सदर इसमांविरुद्ध चाळीसगाव शहर पो.स्टे. ला गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय गणेश सायकर करत आहेत.