पहूर : प्रतिनिधी
राज्यभरात महाशिवरात्रीच्यानिमित्त विविध ठिकाणी शिव महापुराण कथा भाविकांच्या माध्यमातून ठेवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जामनेर तालुक्यातील पहूर येथे हि नुकतीच महापुराण कथेला सुरुवात झाली आहे. या कथेचे स्वागतोत्सुक मंत्री गिरीश महाजन, जामनेर नगराध्यक्षा साधनाताई महाजन हे आहेत.
जामनेर तालुक्यातील पहूर येथील श्री संगमेश्वर महादेव मंदिर आरती समितीतर्फे पहूर येथील श्री संगमेश्वर महादेव मंदिरच्या परिसरात दि २३ फेब्रुवारी पासून प्रारंभ झालेला आहे. या कथा प्रवक्ते म्हणून राष्ट्रीय संत महामंडलेश्वर इंद्रदेवेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे शिष्य श्री स्वामी संत आचार्य श्री प्रकाशनंदजी महाराज महंत हे करणार आहेत. तर कथा दि २३ फेब्रुवारी ते २ मार्च या दरम्यान दुपारी १ ते ४ या वेळेत होत आहे. तर रुद्राक्ष वितरण व दीक्षा दि २५ रोजी होणार आहे. या कथेचे आयोजन ग्रामपंचायत पहूर कसबे, पहूर पेठ व समस्त गावकरी मंडळी यांनी केले आहे.