जळगाव मिरर | ९ जानेवारी २०२५
क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा, नुकतेच वृंदावन धाममध्ये अध्यात्मिक गुरू प्रेमानंदजी महाराज यांच्या दर्शनासाठी पोहोचले. या भेटी दरम्यान, त्यांनी त्यांची दोन मुले, अकाय आणि वामिका, सोबत नेली होती आणि प्रेमानंदजी यांचा आशीर्वाद घेतला. या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. विराट आणि अनुष्का दीर्घकाळापासून प्रेमानंदजी महाराजांचे शिष्य आहेत. व्हिडीओमध्ये दोघे गुरूजींशी संवाद साधताना आणि साष्टांग दंडवत करताना दिसत आहेत.
विराट आणि अनुष्का यांची ही भेट दुसऱ्यांदा प्रेमानंदजी महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी होती. याआधी, जानेवारी 2023 मध्येही त्यांचं दर्शन घेतले होते. व्हिडीओमध्ये अनुष्का प्रेमानंदजींना सांगते, “गेल्या वेळी आम्ही तुमच्या भेटीला आलो, तेव्हा माझ्या मनात काही प्रश्न होते. मी विचार केला की तुम्हाला काहीतरी विचारेन, पण इथे बसलेल्या प्रत्येकाने त्याच संदर्भातील प्रश्न विचारले होते. मला जणू काही प्रश्न विचारायला लागले होते.” अनुष्का पुढे सांगते की, “दुसऱ्या दिवशी, एकांतिक वार्तालाप पाहताना, एक व्यक्ती त्याच प्रश्नावर चर्चा करत होती, जणू माझ्या मनातीलच प्रश्न तिने विचारला होता.”
या संवादादरम्यान, विराट आणि अनुष्का यांची मुलं वामिका आणि अकाय त्यांच्या कुशीत आराम करत आहेत. अनुष्का प्रेमानंदजींना म्हणते, “आम्हाला फक्त प्रेम आणि भक्ती द्या.” प्रेमानंदजी महाराज या शब्दांना प्रतिसाद देताना म्हणतात, “तुम्ही दोघं खूप धैर्यवान आहात. जगातील अनेक गोष्टी मिळवल्यानंतर भक्तीकडे वळणं खूप कठीण असतं. तुमच्या भक्तीचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. नाप जपाचा अभ्यास केल्यास, लौकिक आणि पारलौकिक दोन्ही क्षेत्रांत प्रगती होईल. देवाच्या नावाचा जप करा आणि आनंदाने राहा.”
https://x.com/mufaddal_vohra/status/1877626069630542226?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1877626069630542226%7Ctwgr%5Edc957715d87804b1401299e3f67d936ac3df8b2f%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fentertainment%2Fvirat-kohli-anushka-sharma-along-with-kids-vamika-akaay-visit-premanand-maharaj-here-is-what-they-asked-1332218.html
आणखी एक महत्त्वपूर्ण संवाद, प्रेमानंदजी विराटला सांगतात, “तुमचं खेळ आणि भक्ती हीच साधना आहे. तुमच्या विजयामुळे संपूर्ण भारतातील मुलं आणि त्यांचे कुटुंबीय आनंदित होतात. तुमच्यासाठी साधना आणि भक्ती हीच सर्वोत्तम आहे. अभ्यास महत्वाचा आहे.”