जळगाव मिरर | २८ सप्टेंबर २०२४
जळगाव-मुक्ताईनगर बोदवड रावेर तालुक्यात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते परंतु सतत पडत असणाऱ्या संततधार पावसाने या तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असुन सततच्या पावसाने यंदाच्या खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे.
प्रामुख्याने मका सोयाबीन उडीद मुग या पिकाला मोठा तडाखा बसला.आहे तर कपाशीच्या कैऱ्या सडायला लागल्या असुन कपाशीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे यामुळे शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले असुन ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव स्वरूपात सरसकट आर्थिक मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे शेतकरी बांधवानी जुन जुलै महिन्यात खरिपाची पेरणी केल्यानंतर सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पिक चांगले बहरल्याने शेतकरी बांधवां मध्ये आनंदाचे वातावरण होते त्यामुळे शेतकरी बांधवानी पिकांना मुबलक प्रमाणात रासायनिक खते, कीटकनाशके फवारणी केली परंतु जुलै महिन्यापासून सतत कोसळत असलेल्या संततधार पावसाने मुक्ताईनगर, बोदवड, रावेर तालुक्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे सततच्या पावसामुळे शेतातील पाण्याचा निचरा न झाल्यामुळे शेतात पाणी तुंबले आहे त्यामुळे कपाशी पिकांवर बोंडअळी, मर, लाल्या इ. रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे तसेच सततच्या पावसामुळे कपाशीला असलेल्या कैऱ्या काळ्या पडून सडायला लागल्या आहेत काही ठिकाणी कापसाची फुटलेली बोंडे खराब झाली आहेत यामुळे कापुस पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
तसेच काढणीला आलेले सोयाबिन, मका, उडीद, मुग, भुईमूग या पिकांचे अतोनात नुकसान होऊन जमीनदोस्त झालेले आहेत
सोयाबिन, मका यांना कोंब फुटले आहेत काही मंडळात गेल्या दोन दिवसात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे कापून टाकलेला मका,सोयाबिन वाहून गेले आहे सुरवातीला पिकांची स्थिती उत्तम असल्याने शेतकरी बांधवानी पिकांवर आतापर्यंत लाखो रुपये खर्च केला आहे परंतु ओल्या दुष्काळाच्या अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधवांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे त्यामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत अशा परिस्थितीत सरकारने अन्नदात्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ शेतकरी बांधवांना सरसकट हेक्टरी भरीव स्वरूपात आर्थिक मदत करून शेतकरी बांधवांना आर्थिक गर्तेतून वाचवावे अशी मागणी करण्यात आली आहे
यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या अतिवृष्टीमुळे शेतात उभ्या असलेल्या मका सोयाबिन कापुस उडीद मुग भुईमूग ई पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असूनशेतकरी बांधवाचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे शेतकऱ्यांनी जिवापाड मेहनत घेऊन लाखोंचा खर्च करून शेत शिवारात पिक उभे केले होते परंतु आता काढणीला आलेले पिक वाया गेले आहे यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.आधीच हमीभावाच्या समस्यांनीग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर आता ओल्या दुष्काळाचे संकट कोसळले आहे या कठीण प्रसंगी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आह. या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने त्वरित पावले उचलुन आचार संहिता लागण्या पुर्वी सरसकट हेक्टरी भरीव आर्थिक मदत देऊन शेतकरी बांधवांना या संकटातुन बाहेर काढावे असे रोहिणी खडसे म्हणाल्या यावेळी बोदवड बाजार समितीचे संचालक अंकुश चौधरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार जिल्हा सरचिटणीस प्रविण दामोधरे ,तालुका सरचिटणीस रविंद्र दांडगे उपस्थित होते