जळगाव मिरर | ३ जून २०२५
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरु असतांना काल दि.२ रोजी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांचा पक्ष सध्या जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर असल्याचा दावा केला होता. ठाकरे यांच्या पक्षात पुढील आठ दिवसात मोठा भूकंप होणार आहे. या पक्षात कोण राहणार आणि कोण राहणार नाही? हे देखील स्पष्ट होईल, असे सूचक विधान देखील मंत्री महाजन यांनी केले होते. त्यांच्या या विधानाला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हा माणूस पैसा आणि पोलिसांच्या बळावर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीनदोस्त करायला निघाला असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
या संदर्भात राऊत यांनी एका पोस्टच्या माध्यमातून मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली. गिरीश महाजन यांचे स्वतःचे कर्तृत्व काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दुसऱ्यांचे पक्ष कडून स्वतःच्या पक्ष सुजवायचा! असा आरोप देखील राऊत यांनी केला आहे. हा माणूस पैसा आणि पोलिसांच्या बळावर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीनदोस्त करायला निघाला असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. या संदर्भात संजय राऊत यांनी पोस्टमध्ये लिहिले की, गिरीश महाजन यांचे स्वतःचे कर्तृत्व काय? दुसऱ्यांचे पक्ष फोडून स्वतःचा पक्ष सुजवायचा! भ्रष्टाचारी देशद्रोही आपल्या पक्षात घेऊन आम्हीच मोठे अशी वल्गना करायची! हा माणूस पैसा आणि पोलिसांच्या बळावर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीनदोस्त करायला निघालाय!




















