जळगाव मिरर / १ जून २०२४
जळगाव शहर वीरशैव लिंगायत गवळी समाजातील १०वी व १२वी उत्तीर्ण व विविध क्षेत्रातील प्राविण्य नोकरी मिळालेल्या,पोलीस भरती,पोस्ट भरती विषयी मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांनचा सत्कार समारंभ व १०वी व १२वी नंतर काय या विषयावर मार्गदर्शन शिबीर उत्साहात संपन्न झाला.
या शिबिराचे मार्गदर्शक पुणे येथील ग्लोबल टेक्सीस संचालक प्रा संभाजी बारसे यांच्या उपस्थितीत यशस्वी झाला.यावेळी समाजातील १० वी उत्तीर्ण झालेल्या नमन बारसे, संजना गठरी,सोहन जोमीवाळे, चेतना हुच्चे, कृष्णा जोमदे, दक्ष पिरणाईक, गौरव बारसे, वैभव बारसे,तन्मय उदीकर या विद्यार्थ्यांनचा सत्कार करण्यात आला.यावेळी जळगाव जेष्ठ पंच खंडूअप्पा बारसे, बाबूराव हुच्चे, शिवाजी बारसे, महाराष्ट्र वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे युवा प्रदेश अध्यक्ष कृष्णा गठरी, दिपक जोमीवाळे,चाळीसगाव न्यायालयातील सिनियर क्लार्क ज्ञानेश्वर बारसे,सुभाष उदीकर तसेच बांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कृष्णा गठरी यांनी केले व सूत्र संचालन दिपक जोमीवाळे यांनी केले.