जळगाव मिरर । २२ डिसेंबर २०२२
गेल्या काही महिन्यापूर्वी दुपारच्या सुमारास व्हॉट्सअॅपचे ठप्प झाले होते. त्याचे मोठे कारण समोर आले आहे. व व्हॉट्सअॅप वापर करीत असलेल्यासाठी हि बातमी खूप महत्वाची आहे. नेहमीच आपण सोशल मिडीयावर वेगवेगळे संदेश वाचत असतो काही फेक असता तर काही खरे असतात पण आपण त्यावर विश्वास ठेवत नाही. अशीच एक माहिती व्हॉट्सअॅपच्या प्रवकत्यानी दिली आहे.
व्हॉट्सअॅप तुमच्या मोबाईलमधील बंद झालंय, तुम्हाला मेसेज येत नाही, तर घाबरु नका. व्हॉट्सअॅप कंपनीने अचानक 37 लाख अकाऊंट बंद केल्याची माहिती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यात त्यांनी अकाऊंट बंद केले आहेत. माहिती टेक्नोलॉजीच्या नियमानुसार 4(1)(डी) चा आधार घेत व्हॉट्सअॅप बंद करण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यात 1 तारखेपासून 30 नोव्हेंबरपर्यंत 37 लाख अकाऊंट बंद करण्यात आहेत. त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यात सुद्धा कंपनीने 35 लाख खाती बंद केली होती. व्हॉट्सअॅपचे प्रवक्त्यांनी कंपनीची भूमिका स्पष्ट केली आहे. एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड मेसेजिंग सेवांमधील गैरवापर रोखण्यासाठी त्यांनी हे मोठे पाऊल उचलले आहे. त्याचबरोबर काही खातेदारकांना सुरक्षित ठेवणे आणि चांगली सुविधा यासाठी आम्ही अजून काही कडल पाऊले उचलणार असल्याचे सांगितले आहे. व्हॉट्सअॅप कंपनीला तुमच्या खात्याचा दुरुपयोग लक्षात आल्यानंतर कंपनी तुमच्या खात्याची तीन पातळी चौकशी करते. त्यामध्ये मेसेज, नोंदणी आणि तुमच्याबाबत दाखल झालेली तक्रार, सगळ्या बाबीमध्ये समजा खाते येत असेल, तर ते खाते बंद केले जात आहे. ज्या व्हॉट्सअॅप खातेदारकाने नियमांचे उल्लंघन केले आहे, अशा खातेदारकांचे खाते बंद करण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्यांनी काही खातेदारक फेक बातम्या व्हायरल करतात, त्याचे खाते सुद्धा बंद करण्यात आले आहे.
