जळगाव मिरर | २९ जुलै २०२५
गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यातील पहूर येथील लोढा नावाच्या व्यक्तीची जोरदार चर्चा सुरु असतांना आता पुण्यातील खराडी परिसरातील उच्चभ्रू सोसायटीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी धाड टाकली. या प्रकरणी पोलिसांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक केली आहे.
आज त्यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपत असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सुनावणीच्या अगोदर एकनाथ खडसे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक धक्कादाक आरोप केले आहेत. पत्रकार परिषद सुरू असताना त्यांच्या घरात पत्रकार असल्याचे भासवत तीन पोलीस अधिकारी आतमध्ये आले होते, असा खळबळजनक आरोप खडसेंनी केला आहे.
पुण्यातील पत्रकार परिषदेतून एकनाथ खडसे यांनी डॅा. प्रांजल खेवलकर यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही, मी आयुष्यात कधीच ड्रग्स घेतलेले नाही, असे मला जावयाने सांगितल्याचे खडसे यांनी सांगितले आहे. त्यांच्यावर पाळत ठेवली जायची साध्या वेशातील पोलीस त्यांच्यावर सतत पाळत ठेवून असायचे असा खळबळजनक दावा खडसेंनी केला आहे.
माजी पत्रकार परिषद सुरू असताना साध्या वेषातील पोलीस पत्रकार असल्याचे भासवून आले होते. माझ्या घराच्या बाहेर आत्ताही पोलीस आहेत. माझ्या छातीवर बसण्याचा प्रयत्न करत आहेत. माझा सरकारला सवाल आहे की, माझ्यावर पाळत का ठेवली जात आहे? असा खळबळजनक आरोप खडसेंनी केला आहे. तर रेव्ह पार्टी ठरवून केलेलं षडयंत्र असल्याचं खडसे म्हणाले आहेत.
वेस्टिन हॉटेल मध्ये पोलिस आले, तिथलं पार्किंगमध्ये सीसीटीव्ही पोलिस दिसत आहे, हा प्रकार संशयास्पद आहे. एवढी तत्परता प्रफुल लोढा हनी ट्रॅपमध्ये सरकार तत्परता घेऊन माहिती का देत नाही, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. रेव्ह पार्टी प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. खडसेंनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहवे लागणार आहे.
