जळगाव मिरर | १७ डिसेंबर २०२४
राज्यातील महायुती सरकारचा मंत्री मंडळ विस्तार झाला आहे तर यंदाच्या मंत्रीमंडळ विस्तारात महायुतीने काही दिग्गज मंत्र्यांना मंत्री मंडळात घेतले नाही यात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आ.अनिल भाईदास पाटील यांना देखील महायुतीने डच्चू दिला आहे. यावर आ.अनिल पाटील यांनी भावना व्यक्त केल्या आहे.
मला मंत्रीपद मिळालेले नसले प्रामाणिकपणे आणि आनंदाने काम करत राहणार आहे, जनसेवेसाठी मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा होती मात्र पक्ष श्रेष्ठींनी जो निर्णय घेतला त्यावर आपली कोणतीही नाराजी नाही या शब्दात माजी मंत्री तथा अमळनेर विधानसभा मतदासंघाचे आमदार अनिल पाटील यांनी नागपूर येथे मीडियाशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
यासंदर्भात अधिक बोलताना ते म्हणाले की मी मदत व पुनर्वसन खात्याचा मंत्री असताना शेतकऱ्यांच्या खात्यावर डी बिटी द्वारे नुकसानरपाईचे पैसे कसे पडतील आणि शेतकरी बांधवांना न्याय कसा देता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सभागृहात असेल किंवा सभागहाच्या बाहेर असेल शेतकरी व जनतेच्या प्रश्नासाठी कायम केल्या भावना आक्रमक राहिलो, त्यामुळे साहजिक मंत्री पद मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु पक्ष श्रेष्ठींनी सामाजिक समतोल राखण्यासाठी आणि काही सिनियर आमदार असतील त्यांना न्याय देण्यासाठी मला थांबविण्याचा निर्णय घेतला असेल, मात्र माझी कोणतीही नाराजी नाही. आणि राहिला विषय माझ्या कामकाजाचा तर त्यात कोणताही फरक पडणार नाही, गेल्या पाच वर्षात जनतेच्या हितासाठी जशी आक्रमकता होती तशीच या पाच वर्षात देखील कायमच राहील. विशेष करून अमळनेर विधानसभा मतदासंघाचां मी आमदार असल्याने याठिकाणी विकासाचे सुरू असलेले पर्व थांबणार नाही. राहिलेली सर्व विकासकामे निच्छित पणे पूर्ण होतील असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.