जळगाव मिरर | २ डिसेंबर २०२३
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरे करीत सभा घेत आहे. शुक्रवारी जालन्यात मनोज पाटलांची विराट सभा झाली. या वेळी त्यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सरकारचा कडक शब्दात समाचार घेतला. ‘सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार आंतरवली सराटीसह राज्यभरातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घ्या. तसेच २४ डिसेंबरपर्यंत विनाअट आरक्षण द्यावे अन्यथा गाठ मराठ्यांशी आहे’, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, सरकारने दिलेल्या मुदतीत आरक्षण न दिल्यास १७ डिसेंबर रोजी आंतरवालीत बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल,’ असेही त्यांनी जाहीर केले.
भाजप आमदार नारायण कुचे, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचाही जरांगे पाटील यांनी समाचार घेतला. राज्य सरकार कुणा एकट्याच्या दबावाखाली येऊन जर मराठ्यांशी दगाफटका करत आहे. मात्र आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही,’ असे त्यांनी ठणकावून सांगितले. ‘सरकारला अन् पोलिसांना आम्ही आतापर्यंत सहकार्यच केले आहे. मात्र यापुढे अपेक्षा ठेऊ नये. आमच्यावर लाठीमार करण्याऱ्या पोलिस अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याऐवजी त्यांना बक्षीस म्हणून बढती देण्यात आली.
गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन पाळले नाही. उलट निष्पाप मराठ्यांना अटक करण्यात येत आहे. हे स्थानिक पोलिस मात्र आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही,’ असे त्यांनी ठणकावून सांगितले. ‘सरकारला अन् पोलिसांना आम्ही आतापर्यंत सहकार्यच केले आहे. मात्र यापुढे अपेक्षा ठेवू नये. आमच्यावर लाठीमार करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याऐवजी त्यांना बक्षीस म्हणून बढती देण्यात आली. गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन पाळले नाही. उलट निष्पाप मराठ्यांना अटक करण्यात येत आहे. हे स्थानिक पोलिसकरत आहे की गृहमंत्री आदेश देत आहे, हे सरकारने सांगावे. आम्ही पाच कोटी मराठे जेलमध्ये जाण्यास तयार आहे,’ असे जरांगे म्हणाले.