जळगाव मिरर | ७ जून २०२३
जळगाव शहरातील एका मुख्य बाजारपेठेत एका ४८ वर्षीय महिलेचा सकाळच्या सुमारास एकाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील परिसरात एक 48 वर्षीय महिला दिनांक पाच जून रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आपले दुकान लावले असताना या ठिकाणी एक इसम येत त्याने महिलेला अश्लील शिवीगाळ करीत महिलेसोबत चुकीचे वर्तन केल्याप्रकरणी एका इसमाविरोधात एमआयडीसी पोलीस स्थानकात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय धनगर हे करीत आहे