
जळगाव मिरर | १६ एप्रिल २०२६
चाळीसगाव शहरातील एका परिसरात घराबाहेर काम करत असताना महिलेचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी एका संशयिताविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात राहणारी ३६ वर्षीय महिला दि. १० एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घराशेजारी काम करीत होत्या. शेजारी राहणाऱ्या संशयिताने पीडित महिलेसोबत अश्लिल वर्तन करीत विनयभंग केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा संशयिताने महिलेच्या घरी येऊन शिवीगाळ करत घरावर दगडफेक केली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ सचिन पवार करीत आहेत.





















