जळगाव मिरर / १२ जानेवारी २०२३
गेल्या तीन ते चार वर्षापासून सोशल मिडीयावरील अनेक प्लॅटफॉर्म आहेत, जेथे सहज तुम्हाला देशासह परदेशातील तरूण-तरूणीचे नाव टाकल्यास लिस्ट येते पण यात भरपुर खातेधारक बनावट असते, अशाचमुळे काही महिलांसह पुरुषांची फसवणूक होवून नंतर धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक घटना ऑनलाईन जुळलेल्या प्रेमातून समोर आली असून महिला आता न्यायाची मागणी करत आहे.
दोन मुलांची आई फेसबुकवर एका तरूणाच्या प्रेमात पडली.ती इतकी प्रेमात होती की, दोन्ही मुलांना सोडून महिला प्रियकरासोबत समस्तीपूरहून हरयाणाला फरार झाली. दोघेही तिथे पती-पत्नीसारखे राहू लागले. पण त्यांचं हे प्रेम जास्त दिवस टिकू शकलं नाही आणि प्रियकराने तिला दगा दिला.
ऑनलाईन प्रेमात आंधळ्या झालेल्या महिलेला प्रियकर दिल्ली स्टेशनवर सोडून फरार झाला. सगळं काही गमावून बसलेली महिला आता न्यायाची मागणी करत पोलिसांकडे पोहोचली आहे. दोन मुलांची आई असलेल्या या महिलेची समस्तीपूर जिल्ह्यातील विभूतिपूरमध्ये राहणाऱ्या तरूणासोबत फेसबुकवर ओळख झाली होती. त्यानंतर दोघे चॅटींग करू लागले आणि प्रेमात पडले. चँटींगची जागा आणि मोबाइल नंबर शेअर करून व्हिडीओ कॉलने घेतली होती. दोघेही सोबत जगण्या-मरण्याच्या शपथा घेऊ लागले होते. दरम्यान तरूणाने महिलेला भेटण्यासाठी सहरसा येथे बोलवलं आणि तिथे दोघांनी शारीरिक संबंध ठेवले. नंतर तरूणाने महिलेला लग्नाचं आमिष दाखवत समस्तीपूरला बोलवलं. महिला कशाचाही विचार न करता दोन्ही मुलांना सोडून समस्तीपूरला पोहोचली. तिथून अजय पासवान महिलेला घेऊन हरयाणाच्या करनालमध्ये गेला. इथे दोघेही पती-पत्नीसारखे राहत होते.
दोन महिने दोघांमध्ये सगळं काही ठीक सुरू होतं. नंतर प्रियकर महिलेला म्हणाला की, आता आपण गावात जाऊनच राहू. त्यासाठी महिलाही तयार झाली. पीडित महिलेनुसार, चार दिवसाआधी दोघेही हरयाणाहून दिल्ली स्टेशनला पोहोचले. दरम्यान अजय पाणी आणण्यासाठी गेला तर परत आलाच नाही. आता सगळं काही गमावून बसलेल्या महिलेला माहेरी आणि सासरच्या लोकांनी ठेवून घेण्यास नकार दिला. पीडित महिलेनुसार, अजयसोबत पळून गेल्याची माहिती तिच्या सासरी आणि माहेरी मिळाली होती. त्यामुळे मला साथ देण्यास नकार दिला. आता ती न्यायासाठी पोलिसांकडे मागणी करत आहे.