जळगाव मिरर | ६ नोव्हेंबर २०२५
शहरात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास संशयित महिला सुभाष चौकातील आर, सी. बाफना ज्वेलर्समध्ये आली. तेथे अंगठ्या अंगठ्यांची अदलाबदल केल्यानंतर ती तेथून जवळब असलेल्या भंगाळे ज्वेलर्समध्ये गेली. याठिकाणी महिलेने दीड लाखांच्या अंगठ्या आदलाबदल करुन चोरून नेल्या. त्यानंतर अखेर ती महिला रिंगरोडवर असलेल्या पु. ना. गाडगीळ या सुवर्णपेढीत गेली. याठिकाणाहून देखील बनावट अंगठ्यांची ठेवून ती महिला सोन्याची अंगठी चोरून नेल्याचे उघड झाले आहे . अंगठी खरेदी करण्याच्या बहाण्याने शहरातील तीन नामांकीत ज्वेलर्सच्या दुकानात जाते. त्याठिकाणी अंगठ्या अघत असतांना सेल्समनचे लक्ष विचलीत करुन हातचालाखी करीत खोट्या अंगठ्या तेथे ठेवून तेथून सोन्याची अंगठ्या चोरुन नेत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहे. एकाच दिवशी या महिलेच्या हातचलाखीने शहरातील तीन नामांकित ज्वेलर्सच्या पुकानांतून ४ लाख ७० हजार रुपये किमतीचे दागिने चोरुन नेले, याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुभाष चौकात असलेल्या आर. सी. बाफना ज्वेलर्समध्ये गणेश राजाराम काळे हे मैनेजर म्हणून नोकरीस आहे. दि. ४ रोजी त्यांच्या ज्वेलर्समधील सेल्समन शिरीष जैन हे त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी अंगठी ट्रे मध्ये नकली अंगती ठेवून सोन्याची अंगठी घेवून गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार त्यांनी शोरुमथील सीसीटीकी तपासले असता, दि. २७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेली एक महिला दुकानात आली. तिने १० ते १२ ग्रॅम वजनाच्या अंगठ्या दाखवायला सांगितल्या, अंगठ्या घघत असताना, शिरीष जैन यांनी ट्रे काढण्यासाठी खाली वाकले, नेमक्या याच संधीचा फायदा घेऊन त्या महिलेने १ लाख ८५ हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, बोटात घातल्या आणि त्याऐवजी तिच्याकडील दोन नकली अंगठ्या ट्रेमध्ये ठेवल्याचे दिसून आले.
शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेले गणेश काळे यांना तेथे भंगाळे गोल्ड ज्वेलर्सचे मैनेजर संतोष चव्हाण देखील भेटले. त्यांच्या दुकानातही दि. २७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता याच वर्णनाच्या महिलेने हातचलाखी करून १ लाख ४५ हजार रुपये किंमतीची १३ ग्रॅम ५४० मिली वजनाची सोन्याची अंगठी चोरल्याचे समोर आले. एकाच महिलेने केवळ अध्या तासाच्या अंतरात दोन्ही दुकानांतून एकूण ३ सोन्याच्या अंगठ्या (३२ ग्रॅगच्या आसपास) लंपास केल्या असून, त्यांची एकूण किंमत ३ लाख ३० हजार आहे, दोन्ही ज्वेलर्सच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास पोलेकों प्रदीप नन्नवरे हे करीत आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दि. १ नोव्हेंबर रोजी दाखल गुन्ह्यानुसार २७ ऑक्टोबर रोजीच सायंकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान एका अज्ञात महिलेने १ लाख ४० हजार रुपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची अंगठी चोरून नेल्याची घटना घडली होती त्यानुसार एकाच दिवशी या टोळीने शहरातील तीन्ही मोठ्या ज्वेलर्स शॉपमधून नकली अंगठ्या ठेवून, सोन्याच्या अंगठ्या लांबविल्या आहेत.



















