
जळगाव मिरर | ५ जून २०२५
निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळ व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिवस वृक्षपूजन व बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन करून साजरा करण्यात आला. याप्रसंगी वडाच्या झाडाचे पूजन करून प्रा राजेंद्र पाटील व सुनील दाभाडे अध्यक्ष सौ मनीषा पाटील यांनी उद्घाटन केले. या नंतर बालचित्रकला स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा तिन गटात संपन्न झाली. यात विद्यार्थ्यांनी सुंदर सुंदर पर्यावरणावर आधारित चित्र काढली. यातून परीक्षक प्रा राजेंद्र पाटील व परीक्षक सुनिल दाभाडे सर उपस्थीत होतें. यात तिन्ही गटात मिळून 400 विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला व एकुण 400 चित्रांचे परीक्षण करण्यात आले. खालीलप्रमाणे उत्कृष्ट चित्रांची निवड करण्यात आली.
गट 1 इयत्ता पहिली ते तिसरी प्रथम निल देवेंद्र कोल्हे द्वितीय निशिता प्रदीप पाटील तृतीय डिंपल मनोज चौधरी उत्तेजनार्थ वरद येवले
गट 2 इयत्ता चौथी ते सहावी प्रथम आर्य विशाल जोशी व्दितीय श्रावणी मनोज बावस्कर तृतीय डिंपल राहुल राका उत्तेजनार्थ दिव्यश्री महेश बोरसे
गट 3 इयत्ता सातवी ते नववी प्रथम श्रद्धा शेखर जैन व्दितीय कार्तिक तुषार मोरे तृतीय पार्शद अनिल अत्तरदे उत्तेजनार्थ आरती भिका पाटील तसेच
विशेष गटातून दिव्यांग विद्यार्थिनींना सन्मानीत करण्यात आले. त्यात तनिष्का हरीश परमार, दीपिका ज्ञानेश्वर पाटील कल्याणी योगेश सोनवणे , हर्षाली अंकुश राठोड, रागिणी शांताराम भराडे असे स्पर्धेचे विजेते घोषित केल्यावर प्रमुख अतिथी मा राजुमामा भोळे आमदार जळगाव शहर मा अजय बढे प्रसिद्ध उद्योजक विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन मा, डॉ अमृता सोनवणे, डॉ नितीन धांडे, चंद्रशेखर नेवे, डॉ गणेश पाटील, राहुल चौधरी पल्लवी सोनवणे,व सौ मनिषा पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या प्रसंगी ऍड सीमा जाधव, वंदना मंडावरे, आशा मौर्य,किमया पाटील,माधुरी शिंपी, शिल्पा बयास,हर्षा गुजराथी, नीता विसावे, रेणूका हिंगु, नूतन तासखेडकर,स्मिता पाटील, श्रावणी पाटील, नेहा जगताप, संगिता चौधरी, मोक्षदा चौधरी, हिमाली परमार, शोभना मकवाना,राखी दुट्टे इत्यादी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन सचिव श्रीमती ज्योती राणे यांनी केले व आभार किमया पाटील यांनी मानले. या वेळीं चित्रकला स्पर्धेतून पर्यावरण जागृतीचा संदेश देण्यात आला व वृक्षारोपण करण्यात यावे याबद्दल जनजागृती करण्यात आली.




















