जळगाव मिरर | २५ एप्रिल २०२४
अल्पवयीन मुलाच्या अजाणतेपणाचा फायदा घेत आक्षेपार्ह व शिवीगाळ करणारा व्हिडीओ तयार करीत तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी मंगळवारी पवन सोनवणे (२६) व मयूर नन्नवरे (२२, दोघ रा. भोलाणे, ता. जळगाव) यांच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर एका जणाने व्हिडीओ व्हायरल केला. यामध्ये दोनजण एका अल्पवयीन मुलाला सोबत घेऊन त्यांनी जातिवाचक शिवीगाळ करीत होते. दरम्यान, पवन रमेश घुसर यांनी ग्रुपवर व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या पीयूष गोयर याच्याकडे विचारपूस केली असता, संपूर्ण माहिती समोर आली. या जातिवाचक शिवीगाळ केलेल्या व्हिडीओमुळे परिसरात रोष निर्माण झाला होता.
दरम्यान, व्हिडीओ तयार करणारे हे पवन सुरेश सोनवणे व मयूर ज्ञानेश्वर नन्नवरे यांनी अल्पवयीन मुलाला एका समाजाबद्दल अपशब्द बोलण्यास भाग पाडून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणी मंगळवारी दोघांविरुद्ध शनिपेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित करीत आहेत