
जळगाव मिरर | २९ ऑक्टोबर २०२४
रस्त्याच्या परिस्थितीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने समोर चालणाऱ्या दुचाकीला कट मारला. यामध्ये दुचाकीचा अपघात होवून अबरार गनिमिया पटेल (वय ३७, रा. शेरा चौक, मेहरुण) हा तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना दि. २५ ऑक्टोंबर रोजी रेमंड कंपनीजवळ घडली. याप्रकरणी धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मेहरुण परिसरातील शेरा चौकात अबरार गनिमिया पटेल हा तरुण वास्तव्यास आहे. दि. २५ ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास ते सुप्रिम कॉलनीतील मशिदीतून नमाज पठण करुन (एमएच १९, डीडबल्यू ००९७) क्रमांकाच्या दुचाकीने घराकडे जात होते. यावेळी रेमंड कंपनीसमोर मागून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १९, डीजी ३५४८) क्रमांकाच्या दुचाकीने त्याला कट मारला. यामध्ये अबरार यांच्या दुचाकीचा अपघात होवून ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, दुचाकीस्वार हा तेथून पसार झाला. अबरार याने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन धडक देणाऱ्या दुचाकस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील हे करीत आहे.