जळगाव मिरर | १ डिसेंबर २०२४
भागीदारीमध्ये मेडीकल व्यवसाय करणारा नीरज प्रभाकर चव्हाण (वय २७, रा. चहार्डी, ता. चोपडा ह.मु. भुसावळ) हा तरुण शुक्रवारी रात्री आठ वाजेनंतर शहरातून बेपत्ता झाला. संशयास्पदरित्या बेपत्ता झालेल्या तरुणाचा मोबाईल आणि दुचाकी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात मिळून आली. एमआयडीसी पपोलिसांनी या घटनेचे गांभीर्य राखत तात्काळ तपासचक्रे फिरवली. त्यानुसार त्याच्या भागीदारांसह दुचाकीसोबत सीसीटीव्हीत कैद झालेल्या हमालाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील नीरज चव्हण या तरुणाने त्याच्या दोन मित्रांसह भुसावळ येथे भागीदारीमध्ये मेडीकलचा व्यवसाय सुरु केला. शहरातील नेरीनाका परिसरात त्यांना एका एजन्सीसोबत दैनंदिन काम असल्याने त्या तरुणाच तेथे येण जाण होते. काही दिवसांपासून व्यवसायातून तिघ भागीदारांमध्ये धूसफूस सुरु होती. त्यामुळे नीरज हा स्वतः मेडिकल एजन्सीचे काम सांभाळत होता भागीदारांमध्ये सातत्याने वाद होत असल्याने त्यांनी व्यवसायात भागीदारी ठेवायची कि नाही, याचा अंतीम निर्णय शनिवारी घेणार होते. मात्र त्यापुर्वीच शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एजन्सीचे दुकान बंद केले.
त्यावेळी नीरज याला एका व्यक्तीचा फोन आला आणि त्यानंतर नीरजचा कुटुंबियांसोबतचा संपर्क तुटल्याचे नीरजची पत्नीने एमआयडीसी पोलिसांना सांगितले. हा संपुर्ण घटनाक्रम एमआयडीसी पोलिसांनी समजून घेतल्यानंतर शनिवारी सायंकाळी पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली.
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी घटनेचे गांर्भीय लक्षात घेत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, त्यांना नीरजची दुचाकी आणि मोबाईल हा शनिवारी पहाटेच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीसमसोर मिळून आला. ही दुचाकी लावणाऱ्या हमालाल पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र मी मद्याच्या नशेत असल्याने मला कोणीतरी दारु पाजण्याचे आमिष दाखवून ही दुचाकी या ठिकाणी लावायला सांगितली, त्यानुसार मी दुचाकी त्याठिकाणी पार्कीग केली अशी माहिती हमालाने पोलिसांनी केलेल्या चौकशीत सांगितल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सांगितले.
नीरज बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या मोबाईलवर अनेक कॉल आलेले आहेत. मात्र साडेसात वाजेनंतर त्याने एकही कॉल रिसीव्ह केलेला नाही. मेडीकल व्यवसायात भागीदार असलेल्या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यामध्ये सर्व शक्यतांची पडताळणी केली जात असल्याचे निरीक्षक निकम यांनी सांगितले.