
जळगाव मिरर । ९ ऑक्टोबर २०२५
कॉफी शॉपच्या नावाखाली महाविद्यालयीन तरुण-तरुणींना अश्लिल चाळे करण्याकरीता तयार केलेल्या कॅफेवर रामानंद नगर पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणी बसण्याकरीता कंपार्टमेंट तयार करुन तेथे सोफे ठेवलेले होते. ही कारवाई बुधवारी दुपारच्या सुमारास केली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात कॅफे सुमारास चालविणाऱ्या मयुर धोंडू राठोड (वय २५, रा. कोल्हे हिल्स) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील गोल्ड जीमच्या पुढे काही अंतरावर चॅट अड्डा च्या नावाने एका गाळ्यात प्लायवुडचे कंपार्टमेंट आणि त्याला पडदे लावून अंधारात महाविद्यालयीन तरुण-तरुणींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देत आहे. अशी माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली. त्यांनी लागलीच गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोहेकॉ जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुधाकर अंभोरे, मनोज सुरवाडे रेवानंद साळुंखे, हेमंत कळसकर, विनोद सुर्यवंशी व योगेश बारी यांचे पथक रवाना केले. या पथकाने चॅट अड्डा नावाच्या कॉफी शॉपवर छापा टाकला.
पोलिसांनी कॉफी शॉपमधील काही जागेची व डस्टबीनची पाहणी केली असता, त्यांना निरोध मिळून आले. तसेच त्यांच्याकडे कॉफी शॉपचा परवाना देखील लावलेला नव्हता. याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित मयुर धोंडू राठोड (वय २५, रा. वाघ नगर, कोल्हे हिल्स) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कॅफेमध्ये तयार केलेल्या कंपार्टमेंटमध्ये काही तरुण-तरुणी अश्लिल चाळे करतांना पोलिसांना मिळून आले. त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची चौकशी करीत त्यांना तोंडी समज देवून सोडून दिले




















