जळगाव मिरर | २४ नोव्हेबर २०२३
एका तरुणीला लग्नाअगोदरच बाळ जन्माला आल्याचा धककादायक प्रकार समोर आल्यानंतर तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून परिचीताने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या तरुणीने एका गोंडस बाळास जन्म दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नशिक येथील अंबड संजीवनगरातील रहिवासी समशेर मुस्ताक अली शहा याने आपल्या ओळखीच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून गेली चार वर्ष तरूणीवर अत्याचार केला असून गर्भवती राहून तिने मुलास जन्म दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.