जळगाव मिरर | १७ मे २०२५
पाचोरा शहरातील छत्रपती संभाजी चौकात तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केला. ही घटना दि. १५ रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चेतन कैलास पाटील (रा. पाचोरा) यांनी याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा शहरात चेतन कैलास पाटील हा तरुण वास्तव्यास आहे. दि. १५ रोजी सकाळच्या सुमारास संशयित दिनेश पाटील, भोला पाटील, गोलू पाटील, विजय पाटील, शिंपी, अनुराग ठाकुर आणि भैय्या पाटील या सात जणांच्या टोळक्याने चेतन पाटील यांना छत्रपती संभाजी चौकात अडवून त्याच्या पाठीत धारदार लोखंडी शस्त्राने वार केले. त्यावेळी आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी व चापटाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये चेतन पाटील गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर पाचोऱ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी संशयींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकों भगवान चौधरी हे करीत आहे.




















