जळगाव मिरर | २४ फेब्रुवारी २०२४
शहरातील सोनी नगरातील सार्वजनिक मैदानात क्रिकेट खेळण्यावरून एका तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरुवार २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात २ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा भागातील सोनी नगरातील सार्वजनिक मैदानात काही तरुण बुधवारी २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता क्रिकेट खेळत होते. क्रिकेट खेळतांना वेदांत नरेश बागडे याचे पियुष समाधान पाटील आणि पियुष कैलास पाटील यांच्यात वाद झाला. क्रिकेट खेळण्यावरून आपापसात शाब्दिक वाद निर्माण झाला. याचा राग मनात ठेवून पियुष समाधान पाटील आणि पियुष कैलास पाटील या दोघांनी लोखंडी सढईने वेदांत बागडे यांच्या डोक्यात टाकून मारहाण केले.
यामध्ये वेदांत बागडे हा गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. दरम्यान वेदांतने दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात मारहाण करणारे पियुष समाधान पाटील आणि पियुष कैलास पाटील या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील हे करीत आहे.