जळगाव मिरर | २० फेब्रुवारी २०२६
शहरातील ऐतिहासिक व प्रेरणास्थान असलेल्या पुतळा परिसराची साफसफाई करून परिसर स्वच्छ व सुशोभित करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. झाडलोट, कचरा संकलन, परिसर धुणे तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.
या अभियानात जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे, जळगाव शहराच्या महापौर दीपमालाताई काळे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश पाटील, नगरसेवक कल्पेश सोनवणे यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वच्छता हीच खरी देशसेवा असल्याचे सांगत नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. युवा पिढीने पुढाकार घेतल्यास शहर अधिक स्वच्छ व सुंदर होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या उपक्रमामुळे कोर्ट चौक परिसर स्वच्छ झाल्याबरोबरच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक संदेशही पोहोचला.





















