जळगाव : प्रतिनिधी
भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे अंकुश बाळू निकम (२८, रा. सुप्रिम कॉलनी) यांच्या नाक, जबडा, डोळ्याला जबर दुखापत झाली. हा अपघात सागर पार्कजवळ झाला. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मजुरी काम करणारे अंकुश निकम हे १२ डिसेंबर रोजी संध्याकाळी दुचाकीने (क्र. एमएच १९, एफएक्स ८६०७) जात असताना सागरपार्कसमोर अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दुचाकीचे मोठे नुकसान होण्यासह निकम यांच्या नाक, जबडा, डोळ्याला दुखापत झाली. उपचारानंतर निकम यांनी या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून २१ डिसेंबर रोजी अज्ञात वाहनधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उषा सोनवणे करत आहेत.