जळगाव मिरर । १२ ऑक्टोबर २०२५
जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या अपघाताचे मालिका नेहमीच सुरू असते. शहरातील नवीन बस स्थानक येथे दिनांक 11 ऑक्टोंबर दुपारच्या सुमारास एका भरधाव चारचाकीने पायी जाणाऱ्या १८ वर्षीय तरुणाला जबर धडक दिल्याने तरुणाच्या पायाला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी रात्री पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावातील १८ वर्षीय तरुण दुपारच्या सुमारास महाविद्यालयातून नवीन बसस्थानक येथे जात असताना त्याला भरधाव चारचाकीने जबर धडक दिल्याने तरुणाच्या पायाला गंभीर जखम झाली असल्याने त्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर जखमी तरुणाच्या नातेवाईकानी रुग्णालयात धाव घेतली होती. त्यानंतर संबधित चारचाकी चालक रुग्णालयात येवून संबधित तरुणाला भरपाई देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा वाद संपल्याचे असल्याची देखील माहिती मिळत आहे. मात्र अशा प्रकारे चारचाकी चालक भरधाव गाडी चालवून रस्त्यावरील तरुणाला धडक देवून भरपाई देवून गुन्हा दडपण्याचे काम देखील करीत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.
सविस्तर बातमी लवकर अपडेट होणार..