जळगाव मिरर | २८ जून २०२४
कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथील आनंद महाराज यांच्या आश्रमाजवळ असलेल्या मोठ्या नाल्यात ऋषिकेश बिलास राठोड (१५) या तरुणावर बिबट्याने हल्ला केला. यात तो ठार झाला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.
सविस्तर वृत्त असे कि, भांबरवाडी येथील आश्रमाचे आनंद महाराज यांच्या आई आश्रमात आल्या असता. त्या मंगळवारी ऋषिकेशच्या घरी जेवायला आल्या होत्या. रात्री साडेसात वाजता जेवण करून ऋषिकेश हा आनंद महाराज यांच्या आईला सोडण्यासाठी आश्रमात गेला होता. चाळीसगावकडून कन्नडकडे जाताना घाट संपल्यानंतर काही अंतरावरच भांबरवाडी लागते दरम्यान, बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात व घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.