जळगाव : प्रतिनिधी
हरिविठ्ठल नगरात राहणारे मजुराचा घरी जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले मात्र त्यांना रुग्णलयात दाखल केले असता त्यांची प्राणज्योत मालवली.
हरीविठ्ठल नगरातील रहिवाशी रघुनाथ चव्हाण हे आपल्या पत्नी मिनाक्षी, लहान मुलगा कुणाल यांच्यासह वास्तव्याला आहे. एमआयडीसीतील खासगी कंपनीत नोकरीला आहे. शुक्रवार १ एप्रिल रोजी रघुनाथ चव्हाण हे दुपारी ३ वाजेच्या सुमारास एमआयडीसी कंपनीतील काम आटोपून घराकडे निघाले होते. दरम्यान, घरी येत असतांना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. एका खासगी रिक्षाचालकाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांची मयत घोषीत केले.
