जळगाव :प्रतिनिधी
अंगणात कार उभी असतांना काही तरूणांनी थापा मारून शिवीगाळ करत होते. याबाबत त्यांनी हटकल्याने राग आल्याचे चाौघांनी मनपा कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे

सविस्तर वृत्त असे की, पिंप्राळा रोड परिसरातील दांडेकर नगरातील रहिवासी संजय प्रभाकर बागुल (वय-५२) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवार १८ जून रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास ते घरी आईवडीलांसोबत बसलेला असतांना त्यांच्या अंगणात त्यांची कार उभी असतांना काही तरूणांनी थापा मारून शिवीगाळ करत होते. याबाबत त्यांनी हटकल्याने राग आल्याचे चाौघांनी संजय बागुल यांना महेंद्र समाधान सपकाळे रा. बुध्द नगर, उमाकांत वाघ रा. मिराबाई नगर पिंप्राळा, राकेंश मिलींद जाधव रा. मढी चौक, पिंप्राळा, आणि एक अनोळखी व्यक्ती अशा चौघांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात महेंद्र सपकाळे याने चॉपरने वार केले तर उमांकात वाघ याने फायटरने बेदम मारहण केली. तर संजय बागुल यांच्या आईवडीलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी संजय बागुल यांनी रविवार १९ जून रोजी सकाळी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी महेंद्र उर्फ दादू समाधान सपकाळे रा. बुध्द नगर, उमाकांत वाघ रा. मिराबाई नगर पिंप्राळा, राकेंश मिलींद जाधव रा. मढी चौक, पिंप्राळा, आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ निलेश पाटील करीत आहे.




















