• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

‘त्या’ तरुणाचा अपघात नसून खून ; तीन जणांना अटक

पोलिसांनी लावला काही तासात शोध

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 12, 2022
in Uncategorized, क्राईम, जळगाव
0
छतावरून पडून तरुणाचा मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी  
शहरातील गोलाणी मार्केटमध्ये तिसऱ्या मजल्यावरुन पडून मुकेश रमेश राजपूत (वय ३२, रा. नाथवाडा) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री २ वाजेच्या सुमारास घडली होती. मुकेश याचा अपघात नसून तिसऱ्या मजल्यावरुन ढकलून खून केल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी शहर पोलिसांनी बुधवारी तीन जणांच्या अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील खाऊ गल्लीत मुकेश राजपूत हा चायनीजच्या गाडीवर कामाला होता. सोमवारी काम आटोपून नेहमीप्रमाणे तो घरी निघून गेला. अमर ऊर्फ लखन व पराग ऊर्फ बबलू या दोघांनी मुकेशला पार्टी करायची असे सांगत घरुन बोलावले. त्यानंतर दाणाबाजातून बिरयानी व दारु घेतल्यानंतर तिघेही दारु पिण्यासाठी गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावर गेले. याठिकाणी दारु पिता अमर व पराग या दोघांनी मुकेश सोबत वाद घातला. हमरीतुमरी झाल्यावर दोघांनी मुकेशला तिसऱ्या मजल्यावरुन ढकलून दिले होते. यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मुकेशचा जागीच मृत्यू झाला होता.

मुकेश खाली पडल्यानंतर अमर व पराग हे दोघेही स्वत: पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी मुकेश हा तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुकेशचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला होता. याप्रकरणी सीएमओ डॉ.अजय सोनवणे यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मंगळवारी दुपारी मुकेशच्या नातेवाईकांनी त्याचा अपघात नसून त्याच्यासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता. संशयित आरोपी अमर उर्फ लखन शांताराम बारोट वय २९ रा. कासमवाडी, रचना कॉलनी, पराग उर्फ बबलू रवींद्र आरखे वय २३ न्यू. सम्राट कॉलनी व निखिल राजेश सोनवणे २२ कुसुंबा ता. जळगाव अशी अटकेतील तिघांची नावे आहेत.

नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्याने पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याची कर्मचाऱ्यांची यंत्रणा कामाला लागली होती. यात गोलाणी मार्केट येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करतांना, एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मुकेशला दोन जण फेकताना कैद झाल्याचे समोर आले. दोघेही संशयितांची नावे निष्पन्न केल्यावर शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी संशयितांच्या शोधार्थ रवाना झाले. गुन्हे शोध पथकातील भास्कर ठाकरे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला सेवा बजावली आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित हे एमआयडीसी हद्दीतील असल्याने त्यांनी बातमीदार कामाला लावले. बातमीदाराने दोघेही संशयित सम्राट कॉलनीत असल्याची पक्की खबर दिल्यानंतर भास्कर ठाकरे यांनी तत्काळ दुचाकीवरुन घटनास्थळ गाठत अमर ऊर्फ लखन व पराग ऊर्फ बबलू या दोघांना ताब्यात घेतले. ठाकरे यांनी वरिष्ठांना संशयितांबाबत माहिती दिली. व इतर कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. त्यानुसार पोलीस निरिक्षक विजयसिंग ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विजय निकुंभ, उमेश भांडारकर, योगेश पाटील, गजानन बडगुजर, रतन गिते, प्रफुल्ल धांडे, प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने संशयितांना पोलीस वाहनातून शहर पोलीस ठाण्यात आणले. शहर पोलीस ठाण्यात आणल्यावर सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह पथकाने पोलिसी खाक्या दाखविताच अमर व पराग या दोघांनी निखील रमेश सोनवणे यांच्या सांगण्यावरुन मुकेशला मारल्याची कबूली दिली. त्यानुसार शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तत्काळ माहिती काढत गोलाणी मार्केटमधून निखील सोनवणे याच्या मुसक्या आवळल्या. अनैतिक संबंधांच्या प्रकारातून मुकेशचा काटा काढण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्ह्यात खूनाचे कलम लावण्यासह पोलिसांची कारवाई सुरु होती. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी करीत आहे.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group