• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

नुकसान भरपाईची उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावी – भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 21, 2022
in जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, सरकारी योजना
0
नुकसान भरपाईची उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावी – भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा : प्रतिनिधी
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन – २०२१ अंतर्गत पाचोरा व भडगाव तालुक्यातील पात्र विमाधारक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात उत्पन्नावर आधारित नुकसान भरपाईची उर्वरित रक्कम तात्काळ जमा करावी. याकरिता भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना निवेदन देण्यात आले. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन – २०२१ अंतर्गत पाचोरा व भडगाव तालुक्यातील प्रमुख पिके असलेल्या (कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, इ.) पिकांचे खरीप हंगामात सुरुवातीला पडलेल्या पावसाच्या खंडा (ग्रॅप) मुळे तसेच नंतर झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणे बाबत व प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत होणेबाबत त्यावेळी देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मागणी केली गेली होती. या अनुषंगाने संबंधित विमा कंपनी (आय. सी. आय. सी. आय लाॅम्बर्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि.) (भारतीय एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी ही आता आय. सी. आय. सी. आय. लाॅम्बर्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. चा भाग आहे) यांनी तात्काळ नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी.अशी मागणी त्यावेळी केली होती असे अमोल शिंदे यांनी सांगितले.सदरच्या मागणी व सततच्या पाठपुराव्यानुसार नुकसानीचे पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना व प्रतिकूल हवामान परिस्थिती (मिड सिझन अॅडव्हर्टसिटी) मध्ये पाचोरा व भडगाव तालुक्यातील पात्र एकूण ७७१ शेतकऱ्यांना ८५ लाख २८ हजार २९८ रुपये व वैयक्तिक नुकसान व सॅम्पल सर्वेनुसार झालेल्या नुकसानी करिता पाचोरा व भडगाव तालुक्यातील ४ हजार ४६० शेतकऱ्यांना १ कोटी ७८ लाख ५० हजार ४२८ रुपये आज पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे. परंतु उर्वरित शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम म्हणजेच सॅम्पल उत्पन्नावर निश्चित झालेले नुकसान भरपाई (येल्ड बेस्ड लाॅसेस) ची रक्कम आज तागायत सदरील विमा कंपनीने शेतकऱ्यांना अदा केलेली नसल्याचे माहिती प्राप्त झालेली आहे. तसेच सदरील नुकसानीची रक्कम निश्‍चित करण्याकरता आवश्यक असलेले पिक कापणी प्रयोगाचे संकलन (क्राॅप कटींग एक्स्पेरिमेंट) देखील जळगाव जिल्ह्यात पूर्ण झाले असल्याचे त्यांनी बोलतांना सांगितले. तरी तात्काळ संबंधित विमा कंपनीस शेतकऱ्याची नुकसान भरपाई ची उर्वरित रक्कम अदा करणेबाबत आदेशित करावे. तसेच तात्काळ या विषयात लक्ष घालून संबंधित विमा कंपनीस आदेशित करावे. असे निवेदनाद्वारे मांडण्यात आले. व सदर निवेदनाची प्रत प्रांताधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांना देखील देण्यात आली आहे. याप्रसंगी जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, विधानसभा क्षेत्रप्रमुख हिम्मतसिंग निकुंभ, सरचिटणीस गोविंद शेलार, दिपक माने, सुनील पाटील, समाधान मूळे, बाळकृष्ण धुमाळ, जगदीश तेली, जगदीश पाटील, विरेंद्र चौधरी सह पदाधिकारी उपस्थित होते.

Related Posts

बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

मध्यरात्री एलसीबीचा मोठा ड्रग्जवर प्रहार; ३ लाखांचे एमडी जप्त, मुख्य पेडलर भैय्या सोनवणे फरार !

July 14, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

खंडेराव नगराजवळ धावत्या रेल्वेची धडक; ४७ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

July 14, 2026
महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !
क्राईम

महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !

July 13, 2026
विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ
जळगाव

विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ

July 13, 2026
“खेळाच्या मैदानासाठी मुलांचा मनपात एल्गार : वादग्रस्त भूखंड प्रकरणी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या; तात्काळ पंचनाम्याचे आदेश !
जळगाव

“खेळाच्या मैदानासाठी मुलांचा मनपात एल्गार : वादग्रस्त भूखंड प्रकरणी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या; तात्काळ पंचनाम्याचे आदेश !

July 13, 2026
आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !
क्राईम

आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !

July 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

मध्यरात्री एलसीबीचा मोठा ड्रग्जवर प्रहार; ३ लाखांचे एमडी जप्त, मुख्य पेडलर भैय्या सोनवणे फरार !

July 14, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

खंडेराव नगराजवळ धावत्या रेल्वेची धडक; ४७ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

July 14, 2026
महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !

महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !

July 13, 2026
विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ

विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ

July 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group